कोरोना आजारामुळे घरात असणार्यांसाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून माधवबागची आरोग्य चळवळ!
संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोना विषाणूच्या समस्येने थैमान घातले आहे. नागरिकांनी समाजात न मिसळता घरातच थांबणे हाच यावर प्रतिबंधक उपाय आहे. ज्येष्ठ नागरिक, रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेले आणि / किंवा क्रोनिक आजार असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसची बाधा होण्याची जास्त शक्यता असल्याचे दिसून आले आहे. या व्हायरसच्या बाधेमुळे मृत्यू होण्याची शक्यता हृदयविकार असलेल्या लोकांच्या बाबतीत 10.5%, मधुमेहींच्या बाबतीत सुमारे 7.3%, श्वसनसंबंधी विकार असलेल्या लोकांच्या बाबतीत जवळजवळ 6.3%आणि रक्तदाब व कर्करोग असलेल्या रुग्णांच्या बाबतीत अनुक्रमे 6% व 5.6% आहे. मात्र अशा क्रोनिक रुग्णांनी सध्याच्याअशा परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये जाणे अतिशय धोकादायक ठरू शकते, कारण या ठिकाणी अनेकांचा संपर्क येऊ शकतो. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी माधवबागने mibPULSE हे मोबाईलवरील अॅप तयार केले आहे. हे mibPULSE अॅप सर्व अँड्रॉईड डिव्हायसेसवर अॅप स्टोअरद्वारे सहज उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करायला व वापरायलाही अतिशय सोपे आहे. याद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांशी चॅट करून त्यांच्या ज्ञानाच्या आधारे नागरिक त्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवू शकतात. रुग्ण किंवा ज्या कुणाला वैद्यकीय मदत हवी असेल, असे कुणीही हे निःशुल्क अॅप वापरू शकते. नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्न वा शंकाचे समाधान, 450 डॉक्टरांच्या टीमकडून केले जाईल. त्याचप्रमाणे आहार, व्यायाम, मनस्वास्थ्य, जीवनशैली या विषयीचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणारे तज्ज्ञांचे व्हिडिओ या अॅपवर उपलब्ध आहेत.
अॅप वापरणार्यांनी स्वतःच्या आरोग्याविषयीची शुगर, ब्लड प्रेशर, वजन इत्यादी माहिती या अॅपमध्ये भरल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्या आजारासंदर्भात काय केले पाहिजे याचा सल्ला मिळेल. यात वैयक्तिक गरजेनुसार आहारयोजना व व्यायामाचे मार्गदर्शनही मिळेल. घरातून बाहेर न पडताही नागरिकांना आरोग्याची सर्व व योग्य काळजी घेण्याकरता या अॅपमध्ये मदत मिळणार आहे. यामुळे दीर्घ काळ सेल्फ क्वारन्टाईनमध्येच राहणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे नागरिकांना सोपे होणार आहे.
अँड्रॉईड डिव्हाईसवर हे अॅप डाऊनलोड करण्याकरता प्लेस्टोअरवर किंवा http://mibpulse.in/ या संकेतस्थळावर mibPULSE app उपलब्ध आहे.
अधिक माहिती साठी *
संपॆक 📢📢
* माधवबाग सोलापूर ऐम्पलामेंट चौक*
9420702358
0 Comments