अकलूज मध्ये किराणा दुकानदारांकडून ग्राहकांची लूट ?
भाजी मंडई अकलूज येथे गणपती मंदिरा पाठीमागे अनेक किराणा दुकाने असून यातील चैत्राली किराणा स्टोअर्स या दुकानदारांकडून ग्राहकांची फसवणूक होते का काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ग्राहकांनी जीवनावश्यक वस्तू घेतल्यानंतर सदर दुकानदार कोऱ्या कागदावर किराणा वस्तूंची यादी करून, त्यावर ती रक्कम मांडीत असतात. तर यादीवरील रक्कमेचा हिशोब करून बिल आकारत असतात. काही ग्राहक घेतलेल्या मालाची यादी बिल घेत असतील, तर काही घेत नसतीलही? दिनांक २७/०४/ रोजी एका ग्राहकाच्या बिलामध्ये विनाकारण वाढीव रक्कम आढळून आली. सदर ग्राहकाने याबद्दल संबंधित दुकानदारास विचारले असता दुकानदाराने यादी व बिलाची पाहणी करून स्वतःकडे आलेली वाढीव रक्कम ग्राहकाला देण्याचा प्रयत्न केला व चुकून झाले आहे असे किराणा दुकानदाराकडून ग्राहकास सांगण्यात आले.
कोरोनामुळे सध्यस्थिती अत्यंत भीषण बनली असून, गोरगरिबांचे जीवन हालकीचे बनले आहे.लॉक डाऊनमुळे सर्वजण घरात बसूनच कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहेत. ज्यांची हातावरची पोटे आहेत,अशांच्या हाताला काम नाही.! यामुळे त्यांच्या हातात कसलाच पैसा नाही? तर ज्यांच्या हातात थोडाफार पैसा आहे तो काटकसरीने कसातरी दिवस भागवत आहेत.अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या मदतीला धावून जात आहेत. अशी स्थिती असताना वरील दुकानदाराकडून कळत-नकळत घडत असलेला प्रकार हा विचार करण्यास भाग पाडणारा असून संबंधित दुकानदाराची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे असे सर्वसामान्यांतून बोलले जात आहे.
0 Comments