कोरोनाचा "हॉट स्पॉट " बनलेल्या घेरडीत प्रशासनाची करडी नजर
वृत्तदर्पण च्या लाईव्ह टॉक शो च्या माध्यमातून प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी नागरिकांची घालवली भीती
सांगोला (जगन्नाथ साठे ) सध्या संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीचा सामना करीत आहेत. प्रशासनाच्या वतीने योग्य ती काळजी घेतली जात आहे. सध्या सोलापूर शहरासह जिल्हयात ही कोरोनाने शिरकाव केला असून,सांगोला तालुक्यातील घेरडी येथे मुंबई हून आलेल्या एका युवकास कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.या युवकांच्या संपर्कातील एकवीस जणांना तपासणीसाठी सोलापूर येथे पाठविले असून,त्यांचा अहवाल येणे बाकी आहे,एकंदरीत या प्रकरणा वरून सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे, अफवांचे पीक प्रत्येक गावागावात घोंगावते आहे, याच मुद्यावर नेमकी प्रशासनाने कोणती भूमिका घेतली?,नेमके गाव कुठे चुकले ?घोंघावत असलेल्या अफवा रोकायच्या कशा ? कोरोनाची जनजागृतीसाठी कमी कोण पडते ? नागरिकांची जबाबदारी काय ? आणि कोरोनाला हद्दपार करायचे कसे ?या सर्व मुद्यावर नेहमीच संपूर्ण जिल्ह्यात जन माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनेल ने काल सहा ते सात या वेळेत लाईव्ह टॉक शो घेवून जनसामान्यांच्या मनातील आपली भीती कमी करण्याचा प्रयत्न केला.
प्रांताधिकारी उदयसिंह भोसले
प्रा पी सी झपके
सांगोला तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याची दक्षता गेल्या महिन्याभरापासून घेतली जात होती. मात्र बाहेरून घेरडी येथे आलेला एक व्यक्ती कोरोना चा पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत योग्य त्या उपाययोजना सुरू करून संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २१ जणांना तपासणी साठी सोलापूरला पाठवले आहे, त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत मात्र यानंतर तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ नये यासाठी तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहून बाहेरगावाहून गावात येणाऱ्यांची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करणे गरजेचे असून यापुढे अधिक दक्षता घ्यावी लागणार असल्याचा सूर वृत्तदर्पण मार्फत आयोजित लाईव्ह टॉक शो मध्ये अनेक मान्यवरांनी व्यक्त केला.
अनिल मोटे
विनायक कुलकर्णी
तर प्रा.पी.सी.झपके यांनी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे कुटुंब,गाव सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे,प्रत्येकानी प्रशासनावर आगपाखड न करता हे संकट दूर करण्यासाठी आपली ही जबाबदारी आहे, असे समजून प्रशासनास सहकार्य करावे, ही वेळ चुका वर चर्चा करण्याची नसून एकमेकांना सहकार्य करण्याची आहे,असे सांगितले.तर डॉ मकरंद येलपले यांनी येणाऱ्या काळातील कोरोनानंतरच्या संकटावर कशी मात करावी,असे सांगून कोरोना ला नागरिकांनी न घाबरता घरी थांबणे हाच कसा पर्याय ठरतो,हे वैद्यकीय भाषेत समजावून सांगितले. नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत महत्वाची माहिती नागरिकांना दिली. आणि वारंवार साबणाने हात स्वच्छ करण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिला.
डॉ मकरंद येलपले
पत्रकार राजेंद्र यादव
0 Comments