शहराच्या सुरक्षेसाठी सांगोला नगरपरिषदेची विशेष मोहीम
असाध्य आजार असणाऱ्यांचा सर्वे करून त्यांच्याकडे देणार विशेष लक्ष
सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला शहर सुरक्षित व कोरोनामुक्त राहावे, यासाठी सांगोला नगरपरिषदेने आजवर विविध उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून सध्या शहरातील प्रत्येक नागरिकांची घरोघरी जाऊन थर्मल स्क्रिनिंग केली जात आहे. आता या स्क्रिनिंग सोबतच सांगोला नगरपरिषदेने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात शहरातील असाध्य आजार असणाऱ्या नाकरिकांची माहिती गोळा करून एक database (डेटाबेस) तयार केला जाणार आहे.अशी माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
कोरोना काळात आपण सर्वांनी सजग असणे गरजेचे आहे. आपल्या शहराचे रक्षण आपणच करावयाचे आहे.
त्या निमित्ताने सांगोला नगरपरिषदेमार्फत एक विशेष मोहीम सुरू करत आहोत. *या काळात असाध्य आजाराने अनेक नागरीक आजारी असु शकतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही त्यामुळे कमी झालेली असु शकते. म्हणून या साथ रोगाच्या काळात त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे
ज्या नागरीकांना दमा, टीबी,मदूमेह,(Diabetes),उच्च रक्तदाब(High blood pressure), अर्धांगवायू किंवा हृदयरोग(Heart patient) आहे अशा नागरीकांची माहीती नगरपरिषदेकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे.ज्यामुळे त्यांना वेळीच वैद्यकीय मदत देता येईल आणि कोरोना सारख्या साथीच्या काळात त्यांच्या विशेष लक्ष देता येईल.
तरी सध्या नगरपरिषदेचे कर्मचारी घरोघरी थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी येत आहेत. त्याच वेळी त्यांना सर्व नागरिकांनी त्यांना असणाऱ्या असाध्य आजारांबद्दल खरी माहिती देऊन स्वतःच व कुटुंबियांच रक्षण करावे असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले.
0 Comments