मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरचे घवघवीत यश
अमजद अमीन सय्यद
सोलापूर- जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत सहस्त्रार्जुन प्राथ. विद्यामंदिरच्या ४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकाविले. या परीक्षेत इ. २ री मधील कु. शेष्याद्री चंद्रकांत मोगे व अमजद अमीन सय्यद या विद्यार्थ्यांनी १५० पैकी १३६ गुण मिळवून राज्यात ८ वा क्रमांक पटकाविला. तर इ.३री मधील कु. संस्कृती गुरुनाथ जोकारे हिने ३०० पैकी २८२ गुण मिळवून राज्यात १० वा क्रमांक पटकाविला. तर अक्षरा तुकाराम पवार हिने ३००पैकी २६८ गुण मिळवून राज्यात १७ वा क्रमांक पटकाविला. या परीक्षेचा निकाल १००% लागला असून या विद्यार्थ्यांना वंदना शेट्टी, सुवर्णा केत व अनिल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशिद , स.क्षत्रिय समाज विठ्ठल ट्रस्टचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर , शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष बलभिमसा कोल्हापूरे व शालेय समितीचे अध्यक्ष गुलाबसा बारड यांनी कौतुक केले.
0 Comments