Hot Posts

6/recent/ticker-posts

जनसेवा संघटनेच्या वतीने पिसेवाडी येथे रक्तदान शिबीर


जनसेवा संघटनेच्या वतीने पिसेवाडी येथे रक्तदान शिबीर  


अकलूज( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना विजयवाडी, पिसेवाडी यांच्या वतीने, संघटनेचे नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिसेवाडी ता.माळशिरस येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले असून ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.                  कोरोना व्हायरसनं राज्यात थैमान घातले असून, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.तर   संसर्गजन्य रोग संपूर्ण भारतात  फैलावत आहे. कोरोनाचे संसर्गामुळे आणि शाळा महाविद्यालयाला सुट्टी असलेने सगळीकडे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. बाकी सगळ्या गोष्टीला पर्याय आहेत पण रक्ताला दुसरा पर्याय नाही या पार्श्वभूमीवर जनसेवा संघटनेचे नेते डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील यांनी स्वःता रक्तदान करून जनसेवा संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना व जनतेला रक्तदान करणेचे आवाहन केलं होते. या आव्हानास अनुसरून जनसेवा  संघटनेचे १००० कार्यकर्त्यांनी रक्तदान करून  या राष्ट्रीय आपत्ती मध्ये सहभागी व्हायचे ठरवले असुन याच अनुशंगाने आज  मंगळवार दिनांक२८/०४/२०२० रोजी पिसेवाडी या ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबीरात ८१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहभाग नोंदविलाआहे.  विजयवाडी व पिसेवाडी गावातील सर्व ग्रामस्थानी  पुढाकार घेवूण मोठ्या उत्साहात रक्तदान  केले. कोरोना संसर्गाचे आपत्तिमुळे सोशल डिस्टंनस ठेवुनच नियोजन  उत्तम प्रकारे  केले होते. त्यामुळे रक्तदात्यांना कोणतीही अडचण न येता रक्तदान करता आले. या संकटाच्या काळात आपण देशाचे काहीतरी देणे लागतो म्हणुन देशासाठी फूल ना फूलाची पाकळी या उदात्त हेतुने रक्तदान  केलेची रक्तदात्यांची भावना होती.या शिबीरात सहकार महर्षि  शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बँकेचे डाँ राजेश चंकेश्वरा, मयुर माने व इतर  कर्मचारी यांनी रक्तसंकलन  करण्यासाठी सहकार्य केले या शिबीराचे आयोजन यावेळी शेतकरी बँकेचे संचालक श्री.विठलनाना इंगळे,श्री.उमेश(काका)इंगळे बापूराव मगर, सत्यवान मगर,सरपंच दीपक इंगळे ,उपसरपंच राहुल जाधव ,ग्रामपंचायत सदस्य.चंद्रकांत चव्हाण .कुमार भाकरे,  पै.सतीश इंगळे ,संजय भाकरे, शैलेश भाकरे, शहाजी इंगळे, अवीराज इंगळे, आबा पांढरे ,सुजय इंगळे, रामभाऊ भाकरे, अक्षय इंगळे, निखिल इंगळे, आबा जाधव,  संदीप भाकरे ,शिवसाम्राज्य ग्रुप पिसेवाडी, संजय वाघमोडे, जकीर शेख ,आजिनाथ सकट,  सचिन सकट ,कुलदीपक जाधव, दीपक लोखंडे, राजाभाऊ सकट, शंकर लोखंडे, राहूल बधे,
यांनी या शिबीरासाठी विशेष परिश्रम घेतले. तर शिबिरास  शिवामृत दुध संघाचे संचालक नानासाहेब काळे, शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँकेचे चेअरमन सतीश नाना पालकर,  बिट पोलीस हवालदार पंडित मिसाळ आदींनी भेट दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments