प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यात कडक उपायोजना राबवण्याची गरज
चेअरमन बाळराजे पाटील यांची पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
मोहोळ,(तालुका प्रतिनिधी): कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखणेसाठी सोलापूर जिल्ह्यात कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता असून अापल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज पर्यंत ६५ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडलेले आहेत.याचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यामध्ये भिलवाडा पॅटर्न,बारामती पैटर्न किंवा इस्लामपुर पॅटर्न राबविणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदन लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले आहे.
लॉकडाऊनच्या काळातही गोठया प्रगाणात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये
भिलवाडा पॅटर्न, बारामती पैटर्न किंवा इस्लामपुर पॅटर्न राबविणे अत्यंत गरजेचे आहे.आज ही पुणे, मुंबई अथवा इतर मोठचा शहरातुन लोक ग्रामीण
भागात येताना दिसत आहेत.त्यांच्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना रूग्ण आढकुन येऊ लागलेले आहेत.तरी आपण जिल्हा सिमा बंदी, तालुका सिमा बंदी अत्यंत कडक करण्यास प्रशासनास आदेश द्यावेत. जेणेकरून ग्रामीण भागात होणारा कोरोनाचा प्ररार रोखता येईल, असेही निवेदनामध्ये बाळराजे पाटील यांनी म्हटले आहे.
सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यात जीवनावश्यक सेवा च्या नावाखाली अनेक नागरिक फिरताना दिसत आहेत. प्रशासनाचे कार्य उत्तम असले तरी ही जीवनावश्यक सेवाच सर्वांना अडचणीत आणन्याची शक्यता असल्याचेही बाळराजे पाटील यांनी सांगितले.
0 Comments