शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा पगार वेळेत करावा- धैर्यशील मोहिते पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, April 12, 2020

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा पगार वेळेत करावा- धैर्यशील मोहिते पाटील

 शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा पगार वेळेत करावा- धैर्यशील मोहिते पाटील  
 
 
अकलूज( प्रतिनिधी ) : कोरोना संसर्गाच्या विरोधात जीवावर उदार होऊन  कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय  अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा  पगार  वेळेत  करण्यात यावा  अशी मागणी  शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष  तथा  भाजप नेते  धैर्यशील मोहिते-पाटील यांनी  केली आहे. देशातील हरियाणा सारखे राज्य यासंदर्भात कार्य करणाऱ्यांना  दुप्पट  वेतन जाहीर करते,  आपल्याकडे किमान आहे ते वेतन तरी वेळेत मिळावे अशी मागणी धैर्यशील यांनी केली आहे. 
सध्या कोरोना  संसर्गाच्या  संकटात शासकीय अधिकारी व कर्मचारी  आपला जीव  मुठीत धरून  सेवा देत आहेत. यामध्ये विशेषत: पोलीस ,महसूल व आरोग्य खात्याचे  अधिकारी व कर्मचारी सर्वात  पुढे आहेत .सर्वच शासकीय अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. ११एप्रिलची तारीख होऊन गेली तरी यांना मार्चचे वेतन मिळालेले नसल्याने ते तत्काळ मिळावे अशी मागणी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कोरोना संसर्गाच्या विरोधात लढणाऱ्या शासकीय अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना हरियाना सरकारने दुप्पट वेतन देण्याचे जाहीर केले आहे .येथे मात्र आपल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आहे तेच वेतन वेळेत मिळत नसल्याची खंत धैर्यशील यांनी व्यक्त केली. आपल्या कुटुंबाची तमा न बाळगता समर्थपणे या संकटाचा मुकाबला करणाऱ्या  शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना  विमा कवच  व इतर सर्व  सेवा-सुविधा  मिळण्याची मागणी आपण याआधीच केल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले .
चौकट ....
या विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे  पगार अद्याप झालेले नाहीत ...
ग्रामसेवक, कृषि व पं.स. आस्थापनावरील , आरोग्य विभाग, ए.बा.वि.से.यो. अकलुज व माळशिरस , पशुसंर्वधन विभाग,‌जलसंधारन (ल.पा.) विभाग, ग्रा.पा.पु.विभाग,बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages