डॉ. विजय बंडगर यांच्याकडून घेरडीचे जळीतग्रस्त दत्ता माने यांना ५००० हजार रुपयेची आर्थिक मदत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, April 12, 2020

डॉ. विजय बंडगर यांच्याकडून घेरडीचे जळीतग्रस्त दत्ता माने यांना ५००० हजार रुपयेची आर्थिक मदत

डॉ. विजय बंडगर यांच्याकडून  घेरडीचे जळीतग्रस्त  दत्ता माने यांना ५००० हजार रुपयेची आर्थिक मदत 
 
  
सांगोला/प्रतिनिधी:- दि. ११ एप्रिल रोजी  सांगोला शहरातील सुप्रसिद्ध  स्त्रीरोग तज्ञ डॉ. विजय बंडगर  यांच्याकडून घेरडी गावातील जळीतग्रस्त रहिवासी श्री.  दत्तात्रय शामू माने  यांना ५००० हजार रुपयाची आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात आली आहे.  यावेळी  माजी जि.प सदस्य  प्रा.डॉ. किसन माने,  प्रा.  बाळासाहेब सरगर,  श्री. सुरेश बुरुंगले हे उपस्थित होते. दि ७ एप्रिल रोजी  घेरडी गावातील माने वस्ती याठिकाणी रात्री ११:३० वाजता श्री दत्ता माने यांच्या राहत्या घराने पेट घेतला व क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. देवापुढे लावलेल्या आरतीतील वात रात्री उंदरांनी ओढून नेल्यामुळे राहत्या घराने अचानक पेट घेतला त्यावेळी त्यांच्यासह त्यांची पत्नी व मुले घरापुढील अंगणात झोपी गेली होती. अचानक लागलेल्या आगीमुळे  त्यांच्या घरातील  ३ शेळ्या, ३० कोंबड्या,  २ तोळे सोने,  देवाच्या फंडाचे  ४५००० हजार रुपये,  ४ पोती ज्वारी,  ७  पोती बाजरी, जनावरांचा भरडा  असे घरातील  सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. २ बैले, ४ जर्शी गायी, १ खिलार गाय वाचविण्यात यश आले आहे.   
         कोरोना व्हायरसमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या या कुटुंबाला सदर घटनेमुळे  मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसली आहे. सदर दुर्घटना झाल्यानंतर सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते मा.आ.डॉ.भाई गणपतरावजी देशमुख यांनी सदर कुटुंबाला भेट देऊन दानशूर लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून म्हणून घेरडी गावातील व हंगिरगे गावातील अनेक लोकांनी मदत केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगोला शहरातील सुप्रसिद्ध  स्त्रीरोग तज्ञ डॉ. विजय बंडगर यांनीही रोख ५००० रुपयेची आर्थिक स्वरूपाची मदत केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages