घराघरात महामानवास अभिवादन
अकलूज ( प्रतिनिधी) - जगभरात कोरोनाने कहर केला असून कोरोना सारख्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी विश्वभूषन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती मोठ्या उत्साहात समाज बांधवांनी आपापल्या घराघरात साजरी करून महामानवास अभिवादन केले.
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे नियोजन आणि तयारी ही तीन महिने अगोदरच सुरू करण्यात येते. जंगी मिरवणूकी पासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. महापुरुषांच्या जीवनावरती व्याख्यानेही आयोजित केली जातात. घराघरात रंगरंगोटी बरोबरच नवीन पोशाख परिधान करून अविस्मरणीय जल्लोषात मोठ्या उत्साहात समाज बांधव सामील होत असतात.भीम जयंती ही आनंदाचा क्षण आणि मोठ्या उत्साहाचा सण म्हणून साजरा केला जातो. पण यंदाची भीम जयंती ही कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूवर मात करण्यासाठी घराघरातच साजरी करून आनंद व्यक्त केला.

No comments:
Post a Comment