सोलापूरच्या पालकमंत्रीपदी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची निवड
सोलापूर :- सोलापूरच्या पालकमंत्री पदी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नियुक्ती झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. सोलापूरात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती केल्याची माहिती पुढे येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी दुस-या वेळी सोलापूरचे पालकमंत्री बदलावे लागले आहेत. देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तात्कालिक पालकमंत्री दिलीप वळसे पाटलांनी प्रकृतीच्या कारणावरून सोलापूरचे पालकमंत्री पद सोडले होते. काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आली होती. आव्हाडांनी सोलापूरात एक बैठक घेवून कामाला सुरवात केली होती. मात्र त्यांनी स्वतःला वारंटाईन करुन घेतले होते. आता त्यांना ताप आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दरम्यान सोलापूराला कोरोनाने विळखा घातला आहे. दररोज कोरोनाके रुग्ण वाढत असल्याने पुर्ण वेळ आणि स्थानिक पालकमंत्री देण्याची मागणी केली जात होती. अखेर राष्ट्रवादीने याची दखल घेवून सोलापूरच्या पालकमंत्री पदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. लवकरच तसा शासकीय आदेश निघणार आहे. दरम्यान उद्या
दत्तात्रय भरणे सोलापूरात येणार असल्याचे समजते. ना. भरणे हे इंदापूरचे आमदार असून त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला आहे.
0 Comments