कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या
प्रादेशिक लोक संपर्क ब्युरोतर्फे विविध माध्यमातून पुढाकार
ऑनलाईन डिजीटल प्रचार सामुग्री तयार करणे
फिरत्या ऑडियो अनाऊन्समेंट द्वारे ग्रामीण भागातून प्रचार अभियान
लॉकडाऊनच्या काळात शासनाच्या विविध योजनाबाबत जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विशेष
प्रयत्न
डिजीटल प्रचार साधनांचे अभियान
कोविड-१९ या महामारीच्या विविध मुदयाबाबत जनजागृती होण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्युरोतर्फे विविध डिजीटल प्रचार साधनांची निर्मिती करण्यात येत आहे.
यामध्ये वैयक्तिक स्वच्छता राखणे, लॉकडाऊनच्या काळात घरामध्येच राहणे, सार्वजनिक ठिकाणी योग्य
सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळणे, शासनाच्या विविध सूचना व आदेश पाळणे, आरोग्य सेतु अॅप
डाऊनलोड करणे, लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या अत्यावश्यक सेवांची यादी देणे, शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवणे आणि अफवांना आळा बसवणे यांवर भर देण्यात येत आहे. ही सर्व प्रचार साधने प्रादेशिक लोक संपर्क ब्युरोच्या सोशल मिडीयांवर तसेच विभागाच्या सर्व कर्मचा-यांच्या वैयक्तिक संपर्क माध्यमांवर अपलोड करण्यात येत आहे. हे सर्व संदेश व्हॉटसअॅपच्या माध्यमातून दररोज जवळजवळ १३००० लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत.
फिरत्या ऑडियो अनाऊन्समेंटद्वारे जनजागृती अभियान प्रादेशिक लोक संपर्क ब्युरोच्यावतीने ध्वनीमुद्रित गीते व संदेशाद्वारे फिरत्या ऑटोरिक्शा, टेम्पोमधून ऑडियो अनाऊन्समेंट सिस्टीमने जनजागृती अभियान राबविले. यामध्ये प्रामुख्याने कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपायांवर गीत व संदेशाद्वारे जनजागृती केली. हे अभियान महाराष्ट्र व गोव्यातील कोविड-१९ प्रभावित १६ जिल्हे- पुणे, परभणी, नासिक, नांदेड, लातूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, कोल्हापूर, जळगांव, अमरावती, औरंगाबाद, बुलढाणा, अहमदनगर, बीड व साऊथ गोवा या जिल्हयात राबविण्यात आले. दिनांक ७ ते १४ एप्रिल दरम्यान या अभियानात एकुण २३ ऑटोरिक्शा/टेम्पो वरील १६ जिल्हयात सुमारे ७००० कि.मी अंतर कापून प्रचार करण्यात आला. जनतेचया सूचना व प्रतिक्रिया शासनास सादर
लॉकडाऊनच्या काळात जनतेसाठी विविध सुविधा व लाभ शासनामार्फत जाहीर करण्यात आले. प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो मार्फत सामान्य जनतेच्या सूचना व प्रतिक्रिया शासनास सादर करणे हे कार्य ही करते. या अभियानात
ब्युरोमार्फत लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण जनतेच्या हिताच्या शासनाच्या विविध योजनांविषयीच्या प्रतिक्रिया
शासनास कळविण्यात आल्या. ब्युरो कोविड-१९ बाबत केवळ शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करीत नाही तर शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणूनसुध्दा काम करीत आहे.
सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने अफवा/चुकीची माहितीचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरो
मध्ये स्थापन केलेल्या वस्तुस्थिती पडताळणी समितीस प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो सहाय करीत आहे. यासाठी
जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधण्यात येत आहे.
0 Comments