आठवडा बाजार दिवशी बाजाराजवळ प्रचंड वाहतूक कोंडी, वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
*वाहतूक नियंत्रण शाखेने लक्ष देण्याची मागणी:– शहीद अशोक कामटे संघटना*
सांगोला (प्रतिनिधी)
सांगोला आठवडा बाजारा जवळ मिरज –पंढरपूर रस्त्यावर प्रत्येक रविवारी जड वाहनामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत आहे .या समस्या प्रश्नी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घुगे साहेब यांनी संबंधितांना आदेश देऊन वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता उपाय योजना कराव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली आहे.
सांगोला शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे, यासोबतच शहरात वाहनाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.शहरातील बेशिस्त वाहतूक ही सांगोलकरांची डोकेदुखी बनली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक,वासुद चौक,तहसील कार्यालय परिसर या ठिकाणी वारोंवार बेशिस्त वाहने रस्त्यावर पार्क केल्याने वाहतुकीला प्रचंड मोठा अडथळा दररोज होत आहे, शहराच्या अनेक भागांमध्ये नवीन नगरे वसल्यामुळे प्रचंड लोकसंख्या वाढल्यामुळे सतत वाहनांच्या होणाऱ्या वर्दळीमुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तरी या समस्या प्रश्नी सर्वसामान्य नागरिकांनी देखील आपली दुचाकी व चार चाकी वाहने रस्त्यावर पार्क न करता रहदारीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी पार्क करून करून प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. तरी ट्राफिक विभागाने या प्रशनी जागृती प्रबोधन करून या समस्यावर तोडगा काढणे आवश्यकता आहे अन्यथा वाहतूक व्यवस्थेचा मोठा बोजवारा शहरात उडणार आहे तसेच जत, व अकलूज, पंढरपूर या भागातून येणारी जड वाहनांना शहरात सकाळी 9ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवेशावर निर्बंध घालावेत अन्यथा मोठा अपघाताची शक्यता शहरवासीयातून वर्तवण्यात येत आहे.या समस्येविरोधात कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक घुगे साहेब यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे सामान्य नागरिकातून मत व्यक्त केले जात आहे.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने केवळ दंडात्मक कारवाई करण्याऐवजी प्रबोधन व जनजागृती करून शिस्त लावावी तसेच वाहतूक नियमांचे पालन देखील वाहन वाहनधारकांनी करणे आवश्यक आहे.वाहतूक नियंत्रन शाखेद्वारे आता तरी शहरातील वाहतूक समस्या सुटेल का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करावा . महामार्ग विभागाने शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता जत –मंगळवेढा –पंढरपूर –महुद रिंग रोड बाह्यवळण रस्ताही होणे गरजेचा आहे याबाबत भविष्यात कार्यवाही होणे अपेक्षित आहे. ही मागणी शहीद अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे सर यांनी केली आहे.
चौकट: –
1)गर्दीच्या वेळी शहरात येणारी जड वाहतूक
शहीद अशोक कामटे संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे शहरात अवजड वाहतुकीस ठराविक वेळेस प्रवेशास बंदी घालून वाहतूक कोंडी कमी करण्याचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करू.
विनोद घुगे
पोलीस निरीक्षक, सांगोला.
0 Comments