Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रह्मांड कट्टयावर गंधार प्रस्तुत सूर आनंदघन युवा दिवाळी पहाट व ब्रह्मांड युवा पुरस्कार - 2025 सोहळा

 ब्रह्मांड कट्टयावर गंधार प्रस्तुत सूर आनंदघन युवा दिवाळी पहाट व ब्रह्मांड युवा पुरस्कार - 2025 सोहळा




ठाणे : (कटुसत्य वृत्त):-सारे मिळून सर्वांसाठी जिव्हाळ्याचे नाते जपणारे मुक्त व्यासपीठ ब्रह्मांड कट्टा सामाजिक-सांस्कृतिक मंडळ आयोजित ब्रह्मांड कट्टयावर दिवाळी पहाट व ब्रह्मांड कट्टा युवा पुरस्कार-2025 सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता ब्रह्मांड फेज-5 चे भव्य व्यासपीठ,  टी. एम. सी. मैदाना समोर, ब्रह्मांड, आझादनगर, ठाणे येथे दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सुरेल युवा गायकांची सुरांची आतषबाजी होणार आहे. 
गंधार कलासंस्था प्रस्तुत सूर आनंदघन (मराठी-हिंदी गीतांचा सुरेल प्रवास) युवा गायकांच्या आवाजाने सादर केली जाणार आहे. 
ह्यावेळी युवा गायक कलाकार 
नील श्रोत्री, जयेश जाधव, वेदांत फासे, फाल्गुनी जोशी नातू, निशिता मोरे, श्रुती शिंदे, मोहीत जैन, दर्शन वाटोरे तसेच युवा वादक कलाकार राज सिनलकर- की बोर्ड, कुणाल कालेकर- ऑक्टोपॅड, आर्यन पाटील- तबला-ढोलक-ढोलकी तर
निवेदिका म्हणून कांचन टांकसाळे असेल. 

सदर दिवाळी पहाटच्या वेळी ब्रह्मांड परिसरातील युवा युवती यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणाऱ्या ब्रह्मांड कट्टा युवा पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण केले जाणार आहे. तसेच नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येत आहे कार्यक्रमास येताना दिवाळी फराळ आणल्यास तो ओवळा येथील पानखंडा आदिवासी पाड्यात वनवासी कल्याण आश्रमा तर्फे वाटण्यात येईल. ब्रह्मांड कट्टा दिवाळी पहाट कार्यक्रम नि:शुल्क असून जास्तीत जास्त नागरिकांनी यावे असे आवाहन ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव व अध्यक्ष महेश जोशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी

Reactions

Post a Comment

0 Comments