अब.. ब.. ब...मुंबईतील मजूर रस्त्यावर लॉकडाऊन विरुद्ध मजुरांचा ठिय्या
मुंबई: देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने मुंबईत त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्थानकावर धडक दिली असून स्टेशनबाहेर ठिय्या देऊन हे मजूर गावाला जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून जमावाला शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कोरोना व्हायरसमुळे लावलेला लॉकडाऊन संपल्यावर घरी जायला मिळेल, या आशेने हजारो मजूर सकाळपासून मुंबईतल्या वांद्रे स्टेशनवर जमले होते.त्यामुळे या स्थलांतरितांची तारांबळ उडाली आहे. आपल्या गावी परत जाण्याची ओढ आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव यात अडकलेल्या मजुरांना आता कसं इथून हटवावं, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा झाला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही आस्थापना सुरु राहणार नाही. रेल्वेनेही ३ मे पर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक ठिकाणी मजुरांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.

No comments:
Post a Comment