कोरोनाचं मोठ संकट आलं असल तरी आपण त्यासाठी सज्ज आहोत : पंतप्रधान मोदी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2020

कोरोनाचं मोठ संकट आलं असल तरी आपण त्यासाठी सज्ज आहोत : पंतप्रधान मोदी

कोरोनाचं मोठ संकट आलं असल तरी आपण त्यासाठी सज्ज आहोत : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : आपल्यावर सध्या मोठं संकट आलं असल तरी करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण त्यासाठी सज्ज आहोत, असे म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. भारतीय जनता पक्षाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त आज पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, आपल्यावर सध्या मोठं संकट आलं आहे. तरीही आपण खंबीरपणे पुढे जात आहोत. भारत हा विकसनशील देश आहे. आपण एकीकडे गरीबीसारख्या मोठ्या प्रश्नाशीही लढत आहोत. तर दुसरीकडे करोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या प्रयत्नांची सर्व राष्ट्रांनी, जागतिक आरोग्य संघटनेनं प्रशंसा केली आहे. करोनाशी लढताना आपण सर्व देशांसमोर एक उत्तम उदाहरण दिलं आहे.

करोनाविरुद्धच्या लढ्यात भारतानं जे नियोजन केलं आहे, त्याचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं आहे. या लढ्यात ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांना नमन, असे मोदी म्हणाले. तर प्रत्येक भारतीय आज एकत्र, एकसंध आहे. करोनाची लढाई ही मोठी लढाई आहे. यात आपल्याला जिंकायचं आहे. लढून पुढे जायचं आहे, असंही मोदी म्हणाले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages