बाबासाहेबांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही, तर महात्मांनी ज्ञानाचा दिवा लावला : शरद पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2020

बाबासाहेबांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही, तर महात्मांनी ज्ञानाचा दिवा लावला : शरद पवार

बाबासाहेबांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही, तर महात्मांनी ज्ञानाचा दिवा लावला : शरद पवार
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुक लाईवद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती बाबत भाष्य केले. ११ तारखेला महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा, एकतेचा संदेश दिला. त्यामुळे ज्ञानाचा दिवा लावून एक दिवा ज्ञानाचा या प्रकारचा संदेश देण्यासाठी योग्य दिवस आहे, असे शरद पवार म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की, १४ तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. महिनाभर आपण ती साजरी करतो. पण यावेळी आपण एक दिवा संविधानाचा लावून त्यांची जयंती साजरी करुयात. जयंतीला उत्सवाचं स्वरुप येणार नाही याची खबरदारी घेऊयात. गर्दी टाळूया तसंच एकमेकांमध्ये किमान अंतर राहील याची काळजी घेऊया आणि सर्व परिस्थितीवर मात करुयात.
बाबासाहेबांनी कधीही अंधश्रद्धेला समर्थन दिलं नाही. कधीही अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका. माणसानं चिकित्सक असं पाहिजे. अंधश्रद्धेचं समर्थन करु नका असं यावेळी शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी यावेळी मुस्लीम समाजालाही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं.
दरम्यान सोलापुरात एका गावी बैल गाडी शर्यत पार पडली. अशा सोहळा करायची गरज नव्हती. पण आनंद आहे की पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तो प्रकार तिथेच थांबला. तशी तत्परता दिल्लीत दाखवली असती तर आज जे पहायला मिळातंय ते पुन्हा पुन्हा पहायला मिळालं नसतं, असेही पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages