उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पुण्याच्या 'हॉटेल वैशाली'तर्फे 1 कोटींची मदत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पुण्याच्या 'हॉटेल वैशाली'तर्फे 1 कोटींची मदत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पुण्याच्या 'हॉटेल वैशाली'तर्फे 1 कोटींची मदत

 पुणे, दि. 6: 'कोविड-19' च्या संकटाचा सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  'मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19' ला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. येथील प्रसिद्ध 'हॉटेल वैशाली'चे मालक जगन्नाथ शेट्टी यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला एक कोटी रुपयांची मदत केली आहे. शेट्टी यांच्या जगन्नाथ शेट्टी फौंडेशनच्या वतीने ही मदत करण्यात आली.
          याबाबत माहिती देताना, 'जगन्नाथ शेट्टी फौंडेशन'चे विश्वजित जाधव यांनी सांगितले,"जगन्नाथ शेट्टी फौंडेशन'च्या माध्यमातून आम्ही  समाजातील विविध उपक्रमांना मदत करत असतो. श्री. शेट्टी यांनी अतिशय सामान्य परिस्थितीतून वाटचाल केली आहे. त्यांना समाजातील गरीब आणि दुःखी लोकांच्याबद्दल  कळवळा वाटतो. ते समाजातील अडचणीच्या प्रसंगाला नेहमीच धावून जातात. आजवर त्यांनी अनेक उपक्रमांना मदत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ आणि प्रशासन महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी ज्यांना जे शक्य आहे ती मदत करण्याचे आवाहन केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांनी याबाबतचा सातत्याने पाठपुरावा केला."
      'हॉटेल वैशाली'चे मालक जगन्नाथ शेट्टी यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला एक कोटी रुपयांची मदत दिली आहे. शेट्टी यांच्या जगन्नाथ शेट्टी फौंडेशनच्या वतीने ही मदत करण्यात आली. प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन एक कोटीचा मदतीचा धनादेश स्वीकारला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सोशल डीस्टन्स ठेवून मदत स्वीकारन्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रांताधिकारी देशमुख यांनी धनादेश स्वीकारतानाही सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळला.
      पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले,"जगन्नाथ शेट्टी फौंडेशनने केलेली मदत प्रशासनाचे मनोबल वाढविणारी आहे. समाजातून मदतीचा ओघ वाढला तर आमचे बळ वाढेल. पुणे जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे. कोरोनाच्या सरकारच्या लढाईला बळ द्यावे."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages