सोलापुरात तेलंगी पाच्छा पेठ परिसरात कोरोना चा पहिला रुग्ण मिळाल्याच्या वृत्तास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दुजोरा दिला आहे.
हा रुग्ण दहा तारखेला दाखल झाला होता. काल पहाटे सुमारे ०३:३० वाजताच्या सुमारास म्हणजे दिनांक 11 रोजी तो मरण पावला. आज दुपारी 3.30 वाजता त्याचा कोरोना पॉझिटिव्ह असा अहवाल आला आहे.
रुग्णाचे वय 56 आहे पोलिसांनी हा सर्व परिसर आता सील करणं सुरू केल असून आजूबाजूच्या लोकांची तसेच या रुग्णाच्या कुटुंबियांची, तो आणि त्याचे कुटुंबीय इतर किती लोकांना भेटले व असे लोक इतर किती लोकांना भेटले याबाबत माहिती घेणं सुरू झालं आहे.

No comments:
Post a Comment