पुणे विभागात 18 लाख 33 हजार 177 घरांचे सर्वेक्षण पूर्ण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 8, 2020

पुणे विभागात 18 लाख 33 हजार 177 घरांचे सर्वेक्षण पूर्ण

पुणे विभागात 18 लाख 33 हजार 177 घरांचे सर्वेक्षण पूर्ण
तर 83 लाख 79 हजार  व्यक्तींची तपासणी
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
            पुणे दि.7:- पुणे विभागातील  18 लाख 33 हजार 177 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 83 लाख 79 हजार 144 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 687 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

        विभागामध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांकडे सदयस्थीतीत एकुण N95 मास्क 65 हजार 815, ट्रीपल लेअर मास्क 2 लाख 54 हजार 678 एवढे उपलब्ध आहेत. तसेच 4 हजार 270 पीपीई कीट, 9 हजार 65 हॅण्ड सॅनिटायझर (500मिली), 4 हजार 92 व्हीटीएम कीट व शासकीय रुग्णालयात 141 व्हेंन्टीलेटर्स उपलब्ध आहेत व  खाजगी रुग्णालयात 1 हजार 328 व्हेंन्टीलेटर उपलब्ध आहेत.

विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा

        पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 33 हजार 211.453 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे.  पुणे विभागात अंत्योदय (AAY) व प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजना अंतर्गत 27 लाख 8 हजार 711 शिधापत्रिका /कुटुंबापैकी दि. 7 एप्रिलपर्यंत 18 लाख 31 हजार 499 कुटुंबांना गहू, साखर, तूरडाळ, चणाडाळ व तांदळचे 4 लाख 34 हजार 775.41  क्विंटल वितरण करण्यात आले आहे.

        मार्केटमध्ये विभागात 46 हजार 923  क्विंटल अन्नधान्याची अंदाजे आवक असून भाजीपाल्याची आवक 16 हजार 840 क्विंटल, फळांची 3 हजार 325 क्विंटल  तसेच कांदा/ बटाट्याची 8 हजार 244 क्विंटल इतकी आवक झाली आहे. विभागात दि.6 एप्रिल रोजी 103.35 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.38 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.

        विभागामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत 117 व साखर कारखान्यामार्फत 575 असे एकुण 692 रीलीफ कॅम्प स्थलांतरीत मजूरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकुण 65 हजार 376 स्थलांतरीत मजूर असून एकुण 1 लाख 19 हजार 656 मजूरांना भोजन देण्यात येत आहे, असेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages