अडचणीच्या काळात श्री आनंदी गणेश सेवाभावी संस्था बनली अन्नदाता
*३१२४ कुटुंबाना शिधावाटप करून जपली सामाजिक बांधिलकी *
अकलूज ; अकलूज परिसरातील ज्या कुटुंबांना रेशन कार्ड आहे, परंतु ज्यांची नावे अन्नसुरक्षा यादीत नाहीत, त्यामुळे या कुटुंबांना रेशन दुकानाचा माल भेटत नाही. तसेच ज्या कुटुंबांना रेशन कार्ड नाही अशा ३१२४ कुटुंबांना श्री आनंदी गणेश सेवाभावी संस्थेच्यावतीने शिधावाटप करीत असल्याची माहिती अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिली.कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूचे जाळे अखंड जगात पसरले असून त्याने अनेकांना विळख्यात घेऊन त्यांचे जीवन संपवले आहे. कोरोना सारख्या क्रूर विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखंड देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. ज्यांचे हातावरची पोटे आहेत असे कुटुंबही पोटाला चिमटा घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी घरात बसूनच युद्ध लढत आहेत. असा गरीब युद्धा भुकेने व्याकुळ होऊ नये म्हणून अशा अडचणीच्या काळात श्री आनंदी गणेश सेवाभावी संस्था गोरगरिबांची अन्नदाता बनून पुढे आली आहे.
मागील चार दिवसापूर्वीही या संस्थेचे अध्यक्ष किर्तीध्वजसिंह मोहिते- पाटील व अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते- पाटील यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवशंकर बझारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली तर उद्योग महर्षी कै. उदयसिंह मोहिते पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ अकलूज परिसरातील अडीच हजार कुटुंबांना गहू, तांदूळ ,तूरडाळ ,हरभरा ,खाद्य तेल इत्यादी जीवनावश्यक वस्तू घरपोच केल्या. तर सध्याच्या कठीण परिस्थितीला सामोरे जाणारे अकलूज परिसरातील आणखी ३१२४ गोर-गरीब कुटुंबांना शिधावाटप करून श्री आनंदी गणेश सेवाभावी संस्था बनली अन्नदाता.

0 Comments