पुणे जिल्ह्यातील पानटप-या बंद- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व पानटप-या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला (कोवीड-19) जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणून घोषित केलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पुणे शहरामध्ये आणि परिसरामध्ये परदेशातून आलेले देशी, विदेशी नागरिक, पर्यटक यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी हा आदेश दिला आहे.
नागरिकांनी दाखल्यांसाठी इमेलवर अर्ज करावेत- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व सेतू व महा इ सेवा केंद्र पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील ज्या नागरिकांना दाखले आवश्यक आहेत. त्यांनी दाखल्याकरिता आवश्यक लागणारी कागदपत्रे स्कॅन करुन तहसिल कार्यालयाच्या इमेलवर पाठवावी, त्यामुळे सर्व नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने दाखले वितरित करण्यात येतील, असेही कळवण्यात आले आहे.
पुणे जिल्हयातील सर्व आधार केंद्रे बंद-जिल्हाधिकारी राम

पुणे, - जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला (कोवीड-19) जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणून घोषित केलेला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील सर्व आधार केंद्रे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

No comments:
Post a Comment