जागतिक चिमणी दिनानिमित्त स्नेहालयाने पक्षांना दिला निवारा
कारंबा दि.20 – दि.20 मार्च जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून स्नेहालयातील बालकांनी चिमण्या व
पक्षासाठी घरटी तयार केली व प्लास्टिकच्या टाकावू बाटल्यापासून पक्षासाठी पानपोई व धान्यकोठी तयार करून पक्षांच्या तहाण भूकेची सोय केली. स्नेहालयातील समुपदेशक रविंद्र गडदे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. स्नेहालयाचे सी.ई.ओ. सुभाष चव्हाण यांनी पर्यावरण व पक्षाविषयी माहिती सांगितली. पर्यावरण रक्षणासाठी पशु पक्षांचे रक्षण करणे महत्त्वाचे असून सर्वांनी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन व पशुपक्षांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. आज जो कोरोना व्हायरस फैलावत आहे त्याचे कारण पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी योगिता डाके, नवीनचंद्र म्हेत्री, सुरेखा कांबळे, अर्चना शिंदे आदी उपस्थित होते.

0 Comments