जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2020

जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षेसाठी
ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ


पुणे:- सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाअंतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षा 22,23 व 24 मे 2020 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्यास  25 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने परीक्षा शुल्काचा भरणा करण्याची मुदत  31 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती सहकार व लेखा पदविका मंडळ तथा उपनिबंधक (परीक्षा व प्रशिक्षण), सहकारी संस्थाचे सचिव महेंद्र मगर यांनी एका परिपत्रकान्वये दिली आहे.या परीक्षेची सविस्तर माहिती सहकार खात्याच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘महत्वाचे दुवे जी.डी.सी अँड ए. मंडळ’ येथे उपलब्ध असल्याची माहितीही परिपत्रकान्वये देण्यात आली आहे.
--

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages