Hot Posts

6/recent/ticker-posts

राजवर्धन जयंत पाटील यांचा देशमुख परिवाराच्या वतीने सत्कार

राजवर्धन जयंत पाटील यांचा देशमुख परिवाराच्या वतीने सत्कार


टेंभुर्णी[ प्रतिनिधी ] महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टीचे  प्रदेशाध्यक्ष  आ.जयंत पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील तांबवे येथे रणजित देशमुख यांच्या घरी कार्यक्रमानिमित्त आले असता रणजित देशमुख व देशमुख परिवाराच्या वतीने त्यांचा शाल,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजवर्धन जयंत पाटील यांनी जेवणासाठी खुर्ची नाकारत स्वतःकार्यकर्त्यासह चटईवर पंगतीत जेवायला बसत साधी राहणीचा परिचय दिला. आ. जयंत पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांच्या प्रमाणेच कार्यकर्तांना बळ देणारे राजवर्धन पाटील यावेळी उपस्थितांनी अनुभवले. जेवण करत असताना राजवर्धन  यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आ. जयंत पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन विकासाचे राजकारण करताना  राजवर्धन आपुलकीचे, मैत्रीचे, माणुसकीचे नाते जपत आहेत.यामुळे  जनतेचे प्रेम आणि माया महाराष्ट्रभर राजवर्धन यांना मिळत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी रणजित देशमुख, महेश देशमुख, वेभव देशमुख, सुहास देशमुख, उमाकांत देशमुख व सर्व देशमुख कुटुंबिय तसेच सागर खटके, गणेश खटके, सचिन तळेकर, स्वप्नील पाटील, चंद्रकांत साठे, बापु कांबळे आदी जण उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments