Hot Posts

6/recent/ticker-posts

अजिंक्यराणा पाटील यांनी दिला पदाचा राजीनामा

अजिंक्यराणा पाटील यांनी दिला पदाचा राजीनामा


मोहोळ : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. शिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम करण्याची इच्छाही त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केली आहे. या पदावर संधी दिल्याबद्दल पक्ष व शरद पवार यांचा मी ऋणी असेन. विरोधी बाकावर असताना अडीच वर्षांच्या आसपास काम करण्याची संधी मिळाली. या काळात मला दिलेली जबाबदारी मी सर्वतोपरी पार पाडली. आज पक्ष सत्तेत आहे. आता पुढील काळात नव्या व्यक्तीला ही संधी देण्यात यावी. पुढील काळात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन. तसेच मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम करण्याची इच्छा आहे तशी संधी मिळावी, अजिंक्यराणा पाटील पत्रात म्हणाले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्षासोबत काम करण्याचा अनुभव आनंददायक होता. काम करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगली साथ दिली.





Reactions

Post a Comment

0 Comments