जनसेवा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
अकलूज ( प्रतिनिधी ) अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वा - यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे . आधीच शेतकरी हा दुष्काळामुळे पूर्ण खचून गेला होता . त्यातच परत एकदा या अवकाळी पावसामुळे शेतीमधील द्राक्षे , डाळींब , आंबा व ज्वारी , गहू , हरभरा , कांदा या रब्बीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे . गतवर्षीच्या अवकाळी पावसातून बळीराजा सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी कोलमडून गेला आहे . आव्यांचा मोहोर गळून पडलेला आहे तर द्राक्षे भागामध्ये घडांचा खच पडलेला आहे . डाळींब बागांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे . ज्वारीच्या कणसामध्ये पाणी गेल्याने ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे . हा अवकाळी पाऊस शेतक - यावर कोपला असून या पावसामुळे शेतक - यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला असून या अवकाळी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे . सबब या अवकाळी पावसामुळे शेतक - यांच्या शेती पिकांचे झालेल्या नुकसानाची ताबडतोब पंचनामा करून शेतक - यांना शासनाने लवकरात लवकर मदत करावी असे निवेदन डॉ .धवलसिंह मोहीते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली देणेत आले. यावेळी जनसेवा संघटनेचे माणिकराव मिसाळ प्रदेशाध्यक्ष,शिवाजीराव इंगवले देशमुख,अण्णासाहेब इनामदार उपाध्यक्ष,अण्णासाहेब शिंदे युवक प्रदेशाध्यक्ष,सुधीर रास्ते जिल्हा सरचिटणीस,मयुर माने जिल्हा युवक सरचिटणीस, विट्ठल इंगळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य,शहाजीराव पताळे जिल्हा उपाध्यक्ष, सचिन गायकवाड,भानुदास सालगुडे पाटील, संतोष दाभाडे, सतीश इंगळे उपस्थित होते.
0 Comments