श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा
अत्यंत भक्तिभावाने संपन्न
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथे श्री संत सावता माळी प्रतिष्ठान आयोजित श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला.अरण येथून आलेल्या ज्योतीचे भव्य स्वागत आढेगाव , सौंदणे , तांबोळे शिवेवर बुधवारी सकाळी 8.30 वाजता भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकरराव वाघमारे यांच्यासह मोठ्या उपस्थितीत करण्यात आले . त्यानंतर सौंदणे येथे संपूर्ण गावातून सावता महाराज यांची प्रतिमा सह टाळ मृदंगाच्या आवाजात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12 वाजता सावता माळी सभागृहात फुले टाकून भजन कीर्तन करण्यात आले. गुरुवारी चार वाजता हभप श्रीकांत महाराज आरोळे यांचे कीर्तन करण्यात आले . त्यानंतर रात्री 7.30 वाजता नारळ हंडी चा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अरुण जी तीखे , जकराया शुगरचे सर्वेसर्वा सचिन जाधव साहेब , मोहोळ चे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, जिल्हा दूध संघाचे व्हॉईस चेअरमन दीपक माळी , भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण , माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे सर, सौंदणे चे माजी सरपंच भारत सुतकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश माने , सतीश काळे, माळी महासंघाचे विश्वस्त भारत माळी, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मारुती भुजबळ , पंढरपूर मार्केट कमेटीचे संचालक नागनाथ मोहिते , भाजपाचे विकास वाघमारे , मोहोळ चे नगरसेवक सुशील क्षीरसागर , माजी तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण , युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकुश अवताडे, पेनुर चे माजी उपसरपंच प्रकाश गवळी , पंढरपूर तालुकाध्यक्ष शाम गोडसे , सौ. वंदना देवकर , सौ. मिनाक्षी भाकरे , रंगनाथ नाले, सुरेश राऊत, यशवंत नामदे, पेनुरचे माजी उपसरपंच शंकर गवळी, ऍडव्होकेट विशाल चौधरी , नागेश भंडारे , प्रशांत बनसोडे यांचे सह मोठया संख्येने महिला व भाविक उपस्थित होते .
श्री संत सावता माळी प्रतिष्ठान सौंदणे आयोजित हा कार्यक्रम अरण वगळता ग्रामीण भागात गेली 31 वर्ष सातत्याने होत आहे , सोलापूर जिल्ह्यात असा कार्यक्रम प्रथम सौंदणे येथे श्री शंकरराव वाघमारे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी रमेश भानवसे, तुकाराम भानवसे, गोरख भानवसे, सागर वाघमारे, धंनजय भानवसे, संतोष नामदे, महेश भानवसे, सयाजी राऊत, विष्णू भानवसे, वैभव वाघमारे, यांनी प्रयत्न केले
0 Comments