Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड

 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड




अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी निवड नुकतीच जाहीर झाली असून या परिषदेच्या कार्याध्यक्षपदी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची निवडणुक पुणे येथे पार पडली.यामध्ये महाराष्ट्रातील 33 जिल्हा संघटनांनी सहभाग घेतला होता.या निवडणुकीत कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आ.रोहित पवार यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उच्च न्यायालयाचे माझी न्यायमूर्ती अनंत बदर यांनी काम पाहिले
              स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मुहूर्तमेढ रोवलेली होती.त्यानंतर या परिषदेचे दिर्घकाल नेतृत्व शरद पवार यांनी केले होते. शरद पवार यांच्या कार्यकाळात कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली होती.  
          ग्रामीण भागात कुस्तीच्या खेळाला चालना देण्याचे काम व मल्लांना प्रोत्साहन देण्याचे काम डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून होत असून काही वर्षापुर्वी महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या माध्यमातून प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनखाली डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे अकलूज येथे आयोजित करण्यात आली होते तसेच स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील उपमहाराष्ट्र केसरी विजेत्याला मल्ला चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात येतो.डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रातून तसेच सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या चहात्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments