नदाफ पतसंस्थेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा सन्मान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नदाफ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर (सिद्धेश्वर पेठ) यांच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त  सन्मान सोहळा २६ जुलै रोजी सकाळी निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे पार पडला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि समाजात विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नदाफ जमियत महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आरिफ भाई मन्सुरी  उपस्थित होते.
कार्यक्रमाला हाजी के. बी. नदाफ (संस्थापक), सहायक पोलीस आयुक्त सुधीर खीरडकर,
 वरिष्ठ संपादक हाजी एम. डी. शेख, माजी महापौर आरिफ शेख, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तौफिक शेख, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, राज्य अल्पसंख्यांक आयोग सदस्य वसीम बुरहान ऍड रियाज शेख , माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी,  आरटीओ विभागातील अबूबकर नदाफ या प्रमुख मान्यवरांसह  पतसंस्थेचे
व्हा .चेअरमन युसुफ नदाफ , जॉ . सेक्रेटरी दाऊदभाई नदाफ सह सर्व संचालक उपस्थित होते.
         सदर सन्मान समारंभात हाजी एम.डी.शेख, वारीस कुडले, शकील मौलवी, प्रिन्सिपल आसिफ इक्बाल, तौफिक हत्तुरे, मतीन बागवान , सरफराज अहमद, ऍड शकील नदाफ, इफ्तेकार नदाफ, प्रा अकबर नदाफ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी नदाफ समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सन्मान  करण्यात येऊन 12 गरजू व होतकरू विद्यार्थिनीना सायकलचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ही करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना  पतसंस्थेचे चेअरमन म. सलीम नदाफ यांनी मांडली.सूत्रसंचालन सरदार नदाफ यांनी तर आभार जॉ. सेक्रेटरी डॉ. साकिब नदाफ यांनी मानले.  यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सोहळ्याला   नागरिकांची मोठी गर्दी केली होती. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नदाफ पतसंस्थेचे मॅनेजर के एन गुंडेटी व इम्रान शेख सह संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
चौकट -
 सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर
कार्यक्रमाच्या सुरुवातीला  पतसंस्थेची 25 वी वार्षिक सर्व साधारण सभा पार पडली. यात सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला व सभेतील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.
.png)
0 Comments