Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरात भव्य वधु-वर मेळावा

सोलापूर शहरात भव्य वधु-वर मेळावा


सोलापूर शहरात राजमाता सामाजिक प्रतिष्ठान सोलापूर आयोजीत सोलापूर जिल्हा धनगर समाज सेवा संघातर्फे रविवार दि. ०५ एप्रिल २०२० रोजी धनगर वधू-वर समाजाचा पालक परिचय मेळावा (वर्ष वे) डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिध्देश्वर मंदिरशेजारी, सोलापूर येथे आयोजन केले आहे. सदरप्रसंगी संस्थेने वधु-वरांच्या माहिती पुस्तिकेतील मोफत नांव नोंदणी करीता रविवार दि. १५ मार्च २०२० पर्यंत कालमर्यादा ठेवली आहे. तरी इच्छुक पालकांनी याची नोंद घ्यावी. समाजातील बंधु-भगिनींना आवाहन करण्यात येते की, आपल्या मुला-मुलींचे भविष्यातील लग्नासारखे अतिशय महत्त्वाचे अडचणीचे प्रश्न या एकाच छताखाली येऊन विचारमंथन करून कसे वेळेवर सुटतील असे प्रयत्न संस्थेच्यावतीने संयोजक तथा संस्थापक रविंद्र नागणकेरी (९४२१०४१२१३) करीत आहेत. या कार्यास समाजबांधवांचे देखील प्रयत्न, उत्साह याची गरज आहे. सदर मेळाव्यास कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील पालकांची उपस्थिती राहणार आहे. शा कार्यास आपण सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा आणावी त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments