पालखी सोहळ्यात केलेल्या योग्य नियोजनामुळे महारुद्र परजणे यांचा
पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ३० जून रोजी सोलापूर जिल्हा सरहद्द धर्मपुरी येथे आगमन झाला होता. पालखी सोहळ्यातील पहिला मुक्कामाचा टप्पा नातेपुते शहरात होता त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणे येथे पालखी सोहळ्यासाठी १६०० पोलीस कर्मचारी या मध्ये ४०० होमगार्ड १०५० पोलीस कर्मचारी १५० पोलीस अधिकारी असा बंदोबस्त मागवून पालखी सोहळ्यातील गर्दीवर व वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचे काम नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी योग्य नियोजन करून केले होते त्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शनिवार दिनांक २६ जून रोजी महारुद्र परजणे यांचा सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पालखी सोहळ्यातील संस्थांची मोठी वाहने तसेच दिंडीतील वाहने मुक्कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचावी यासाठी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी यांनी पहाटे तीन वाजल्यापासून ठिकठिकाणी चौकातून पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करून वाहने जलद गतीने मुक्कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचवली नातेपुते मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीच्या आरती वेळेस महिलांची व पुरुषांची मोठी गर्दी झाली होती.तसेच त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी व नातेपुते पोलीस यांनी गर्दीत संशयित असणाऱ्या अनेकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई केली.महारुद्र परजणे यांनी पोलीस कर्मचारी घेऊन त्या ठिकाणी गर्दी नियंत्रण येण्यासाठी वारकरी व भाविकांना आवाहन करून उपायोजना केल्या. धर्मपुरी ते नातेपुते व मांडवे हद्दीपर्यंत विना अपघात सुरक्षित अशी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा माळशिरस मुक्कामी मार्गस्थ झाला. पोलीस प्रशासनाकडून योग्य नियोजन झाल्याने पालखी सोहळा प्रमुखाकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या पालखी सोहळ्यातील योग्य नियोजनामुळे महारुद्र परजणे यांना सोलापूर पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान झाला त्याबद्दल नातेपुते शहर व परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवराकडून त्यांचे कौतुक होत असून पुढील कार्यास शुभेच्छा मिळत आहेत.
फोटो ओळी :
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडून प्रशस्तीपत्र स्वीकारताना सपोनी महारुद्र परजणे.
0 Comments