लक्ष्मी विद्यामंदिर येथे कारगिल विजय दिवस साजरा
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचलित, लक्ष्मी आनंद विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज टेंभुर्णी येथे 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच मान्यवराचे ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त भारतीय लष्कर अधिकारी मा. पंकज मोहिते साहेब उपस्थित होते. ते बोलताना म्हणाले की, "प्रत्येक विद्यार्थ्याला लष्करी सेवेत जाता येईल असे नाही; परंतु शक्य असेल त्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपल्या भारत मातेची आणि सर्व बांधवांची सेवा केली पाहिजे. हे देखील एक प्रकारचे राष्ट्रप्रेमच आहे. तसेच प्रशालेचे प्राचार्य विकास करळे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात जाऊन आपापल्या कार्याची चुणूक दाखवून देण्याची व आपलं आपल्या प्रशालेच आपल्या गावाचं व पर्यायाने देशाचं नाव मोठं करण्याचे आव्हान देखील यावेळी त्यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे, सचिवा सुरजा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी मा. पंकज मोहिते, प्राचार्य विकास करळे सर इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक वर्ग व परिसरातील देशप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वजाळे सर तर आभार अडाणे मॅडम यांनी केले.
0 Comments