Hot Posts

6/recent/ticker-posts

आंतरराष्ट्रीय अबॅकस परीक्षेत मुलांनी मिळविले सर्वोच्च क्रमांक

 आंतरराष्ट्रीय अबॅकस परीक्षेत मुलांनी मिळविले सर्वोच्च क्रमांक




माढा (कटूसत्य वृत्त):- आईमा अबॅकस किंग आयोजित आंतरराष्ट्रीय  स्पर्धेसाठी उत्कर्ष क्रिएशन पुणे या संस्थेमार्फत माढ्यातून ज्ञानदीप अबॕकसच्या  तीन विद्यार्थ्यांनी मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस परीक्षेत  घवघवीत यश मिळवून आपले नाव उज्वल केले आहे. विविध वयोगटांतील मुलांनी अत्यंत अचूक व वेगवान गणना कौशल्य दाखवत परीक्षेत सर्वोच्च क्रमांक पटकावले.
या परीक्षेत भारतासह १९ देशांतील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. परंतु माढा येथील ज्ञानदीप अबॕकसच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, चिकाटी आणि बौद्धिक क्षमता यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अंजली रामचंद्र शिंदें , विराज विपूल पुजारी व रुद्र दिपक लोंढे या तीन विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसरा रँक मिळविला आहे. अबॅकसच्या माध्यमातून मुलांचे गणिताचे मूलभूत ज्ञान, एकाग्रता आणि स्मरणशक्ती यामध्ये मोठी वाढ होते असे प्रा.राजेंद्र दळवी यांनी सांगितले.ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानदिप क्लासचे प्रा. व्ही जी दळवी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
           सर्व विद्यार्थ्यांचा  कुर्डूवाडी अबॅकस सेंटरच्या संचालिका सौ जयश्री जाधव तसेच चिंचोली सेंटर चे समीर मुलानी यांनी सत्कार केला.
           या सर्व विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments