लोकनेते बाबुराव (आण्णा) पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाळूज येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
वाळूज, (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जाधव वस्ती या दोन्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक आदिनाथ कादे यांनी भूषवले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नरखेड केंद्र प्रमुख शरद पवार उपस्थित होते,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चवरे,अमोल कादे,विजया मोटे,पालक प्रतिनिधी बाबासाहेब मोटे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष प्रकाश मोटे,तानाजी पाटील , मधुकर घाडगे ,मोहोन कादे, सुधीर मोटे, ज्ञानेश्वर मोटे, श्रद्धानंद ताकभाते,धनाजी मोरे, बाबासाहेब गायकवाड, मारुती चव्हाण,रशीद शेख, दत्त्तात्रय कादे, ब्रह्मदेव जाधव,तुकाराम कांबळे, अनिल कांबळे, हरी खपाले, लहू साठे, शिवाजी क्षीरसागर, उमेश डोलारे, लक्ष्मी कादे, सरस्वती कादे, मोहिनी डोलारे,अनिल कादे,सुहास घाडगे, माऊली पाटील,कुमार कादे,जनार्दन राक्षे, आप्पासाहेब कादे, ज्ञानेश्वर धनवे मुख्याध्यापक हनुमंत कादे, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व लोकनेते आदरणीय बाबुराव(आण्णा ) पाटील,कै ज्ञानोबा कादे (दाजी )व कै सुशांत(पप्पा) कादे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. पाहुण्यांचे स्वागत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीतांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद पवार यांनी मनोगतात जिल्हा परिषद शाळा वाळूज मध्ये आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे व सामाजिक भान जपणारा आहे, जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचा फायदा होणार आहे हा उपक्रम अनुकरणीय आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संयोजक अनिल कादे यांनी आपल्या मनोगतात लोकनेते कै.आदरणीय अण्णांची जयंती दि १ ऑगस्ट रोजी आहे त्या जयंती निम्मिताने गेल्या १४ वर्षांपासून हा शालोपयोगी उपक्रम चालू आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाण्याची बॉटल,वह्या, पेन,रंगपेटी,कंपास,पट्टी, रबर, पेन्सिल, ब्रश, टूटपेस्ट, तेल, साबण, पाऊंच, चित्रकला वही, शाम्पू, कंगवा, शॉपनर, रुमाल इत्यादी २१ उपयोगी साहित्याचे वाटप करून आदरणीय अण्णांची जयंती साजरी केली, इतर गोष्टीवर खर्च करण्यापेक्षा अशा विधायक उपक्रमांनी जयंती साजरी करून त्यांना अभिवादन केले उपस्थित सर्व पाहुणे व पालकांना फुलाचा बुके देण्याऐवजी नेहमी उपयोगी पडेल असा रुमालाचा बुके भेट देण्यात आला हा उपक्रम राबवताना मला मनापासून आनंद होत आहे कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना गूड डे बिस्कीट व कॅटबरी चॉकलेट चे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास घाडगे यांनी केले,आभार गुंड सर यांनी मानले तर सूत्रसंचालन गुरुराज कुलकर्णी यांनी केले.
0 Comments