Hot Posts

6/recent/ticker-posts

निमगाव येथे शनिवारी होणार वावडी व हिरकणी महोत्सव

 निमगाव येथे शनिवारी होणार वावडी व हिरकणी महोत्सव




"सिने अभिनेत्री हिंदवी पाटील यांची उपस्थिती"

अकलूज (कटूसत्य वृत्त):- संपूर्ण महाराष्ट्रभर आकर्षण असणारा निमगाव वावडी व मुली व महिलांसाठी होणारा हिरकणी महोत्सव शनिवार दि.02 ऑगस्ट रोजी दुपारी 12.00 वा निमगाव -पिलीव रस्ता,जिल्हा परिषद शाळा केशवनगर शेजारी आयोजित केला असून या वावडी व हिरकणी महोत्सवाच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण सुप्रसिद्ध अभिनेत्री हिंदवी पाटील  यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती वावडी व हिरकणी महोत्सवचे आयोजक निनाद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी वावडी व हिरकणी महोत्सव संयोजन समितीचे सदस्य बाळासाहेब मगर, युवराज मगर,नंदकुमार मगर पाटील, भारत मगर सर,जयसिंग मोरे,दत्तात्रय मगर ,विश्वनाथ मगर,उदय कदम, नितीन मगर, हनुमंत जगताप,विलास मगर,गंगाधर पवार,प्रमोद मगर ,शशांक जाधव,हर्षद मगर,सोनू पवार,सुमित ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
     5 फुटापासून ते 30 फुटापर्यंतच्या वावड्या तयार करणे व त्या उडविणे हा अनोखा व पारंपारिक खेळ निमगाव ता माळशिरस येथे श्रावण महिन्यात नागपंचमीनिमित्त अनेक पिढ्यांपासून खेळला जातो  गत 5  वर्षापासून  निमगाव वावडी महोत्सवच्या माध्यमातून या पारंपारिक कलेचे स्पर्धेच्या माध्यमातून जतन केले जात असून या माध्यमातून प्रत्येक गटा नुसार रोख रकमेची बक्षिसे दिली जातात या स्पर्धेत तरुणाईचा सहभाग मोठा असतो सन 2025 च्या वावडी महोत्सव स्पर्धेसाठी एक फूट ते सात फूट, सात फूट ते तेरा फूट व तेरा फूट ते व त्यावरील सर्व असे तीन गट केले असून प्रत्येक गटात रोख रकमेची चार बक्षिसे व सन्मान चिन्ह सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री हिंदवी पाटील यांच्या हस्ते वितरित केली जाणार आहे.
            याचबरोबर मुली व महिलांसाठी "हिरकणी महोत्सव" आयोजित केला असून महिलांसाठी होणाऱ्या हिरकणी महोत्सवात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या असून यामध्ये पिठाची चक्की,गॅस शेगडी,  पैठणी साडी,हॅऺड मिक्सर,टिफीन बॉक्स व महिलांसाठी गृहपयोगी वस्तू भेट देण्यात येणार आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तरी या वावडी महोत्सव व हिरकणी महोत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन वावडी व हिरकणी महोत्सव संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments