Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने सॅनिटरी पॅड वाटप

 श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने सॅनिटरी पॅड वाटप 




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित 10 उपक्रम राबविण्यात येणार असून त्या अंतर्गत मासिक पाळीबाबत जनजागृती शिबिर घेण्यात आले. यावेळी 150 विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. 

       श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने  कुंभारी रोड, वंदना पार्क जवळ साईबाबा प्रशालेत मासिक पाळी, सॅनिटरी पॅडबाबत शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मासिक पाळीबाबत मार्गदर्शक राहुल बिराजदार, सामजसेविका लक्ष्मी गज्जम, ॲड.नीता मंकणी, उद्योजिका वर्षा पाथरकर, साईबाबा प्रशालेचे मुख्याध्यापक तिपन्ना कोळी, संस्थेचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
       शिबिरात मार्गदर्शन करताना राहुल बिराजदार म्हणाले, मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिच्याकडे लाजेने नाही तर समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. पाळी दरम्यान योग्य स्वच्छता राखणं हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सॅनिटरी पॅड, पाळी कप यांसारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर आणि त्याबाबत योग्य माहिती मिळणं, ही मुलींच्या आत्मविश्वासासाठी देखील गरजेची बाब आहे. आजही समाजात पाळीबाबत अनेक गैरसमज आणि भीती आहेत. पाळी ही लज्जेची गोष्ट नाही, ती सदृढ आरोग्याची ओळख आहे. असेही ते म्हणाले.
         सुत्रसंचालन बाळू जाधव तर आभार प्रदर्शन अंजली भांडवले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनुश्री कासट, अक्षता कासट, भारती जवळे, अश्विनी म्हंता, शुभांगी लचके, अर्चना बंडगर, सायराबानू लाडलेमशाक, संतोष अलकुंटे, आभिजीत व्हानकळस, राजेश केकडे, दिपक करकी, स्वप्निल बिराजदार, भारत सन्नाके, गंगाधर बहिरगोंडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

■ वर्षभरात दहा सामाजिक उपक्रम
 राबविणार : महेश कासट 

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या 
दहाव्या वर्धापनदिनानिमित वर्षभरात 10 उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत  पहिला उपक्रम अन्नधान्य वाटप, दुसरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि आता  मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम राबविण्यात आला. अशाच पद्धतीने समाज उपयोगी विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments