Hot Posts

6/recent/ticker-posts

कष्टाला कौशल्याची जोड आवश्यक - डॉ. मार्कंडेय

कष्टाला कौशल्याची जोड आवश्यक - डॉ. मार्कंडेय


कळंब,  वृत्तसेवा - शेतकर्यांनी पारंपरिक कष्ट कमी करून त्याला कौशल्याची जोड दिल्याशिवाय दुग्धव्यवसाय परवडणार नाही असे मत कळंब येथे आयोजित रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आयोजित मांजरा कृषी महोत्सवात डॉ नितीन मार्कंडेय यांनी पशुपालन व दुग्ध व्यवसाय या विषयावर व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार परमेश्वर पालकर, डॉ. भगवानराव कापसे, रोटरीचे अध्यक्ष हर्षद आंबुरे, सचिव डॉ हनुमंत चौधरी, संजय देवडा, संजय घुले आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ .मार्कंडेय म्हणाले की शेतकर्यांनी दिवसभर जनावरांच्या मागे फिरायचे सोडून मुक्त गोठा संकल्पना आचरणात आणणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना जास्त दुध देण्यासाठी अठरा तास आराम आवश्यक आहे. आपल्याकडे दहा तास सुध्दा आराम भेटत नाही. तसेच शेतकऱ्यांनी स्वतः डॉ होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर डॉ. भगवानराव कापसे यांनी शेतकर्यांनी गटशेती कडे वळून योग्य नियोजन करून शेती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. एकरी उत्पादन वाढलयाशिवाय शेतकर्यांचा आर्थिक दर्जा उंचावणार नाही. शेतकऱ्यांना श्रीमंत व्हायचे असेल तर फळबागांकडे वळावे. तंत्रज्ञान वापरून आपण शेती करणे आवश्यक आहे. आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करणे सुध्दा शेतकर्यांना जमणे आवश्यक आहे. शेतीकडे उद्योग म्हणून पाहीलयाशिवाय आर्थिक प्रगती श्यकय नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वारे यांनी केले तर आभार डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी मानले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments