Hot Posts

6/recent/ticker-posts

मोबाईल म्हणजे लय डेंजर वस्तू आहे - इंदुरीकर महाराज

मोबाईल म्हणजे लय डेंजर वस्तू आहे - इंदुरीकर महाराज 




कोपरगाव : एका क्लिकवर काय होईल हे सांगता यायचं नाही. हे मी अनुभवातून सांगतो आहे. मी लोकांना हसवतो, पण आता काही लोकांमुळे रडायची वेळ आली आहे, अशी मिश्कीली करीत समाजप्रबोधनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांनी वादाबद्दल चिमटे काढले. कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी  संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने "आजचा युवक दिशा आणि दशा या विषयावर इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी विवेक कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पाच वर्षात केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. महाराजांबद्दल सध्या वाद सुरू आहे. काही ठिकाणी त्यांना विरोध होत असला तरी त्यांचे कीर्तन ऐकणार्यांची कमी नाही. हेच या कीर्तनावरून दिसून आले. त्यांच्या कोपरगावातील कीर्तनाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. तोंडावर गोड बोलणारी माणसं आपला घात करत असतात. जोपर्यंत गरिबी आहे, तोपर्यंत आपल्याला शत्रू नाही. एकदा का श्रीमंती आली की आपलं काही खरं नाही, असेही ते म्हणाले. इंदोरीकर पुढे म्हणाले की, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने आजवर विविध सामाजिक कामे केली आहेत. त्यांना मोठ्यांचे आशीर्वाद आहेत. पूर्वीचा आणि आताचा काळ बदलला. भांडणात आपलेच नुकसान आहे. युवकांनी नम्र व्हा, पैसा जपून वापरा, विवाहात कर्ज काढून होस मौज करू नका, फेटे, फटाके, बँडबाजा आदी वायफळ गोष्टींवर पैसा खर्च न करता त्यातून गरिबांना मदत करा. माणसांचे सगळे दिवस सारखे नसतात, त्याच्यावर कधी न कधी वाईट वेळ येतेच. या जगात देव आहे, आणि साधुसंतांचे शिवाय तो समजत नाही. कोपरगावकर नशीबवान व भाग्यवान आहेत.या जगात पैशावर प्रेम करणारी माणसे जास्त आहेत. जोपर्यंत खिसा गरम आहे, तोपर्यंत जग. खिसा संपला की, जग संपून जाते. हृदयात देव आहे त्याची साधना करा, लाकडात अग्नि आहे घर्षण करा, दुधात लोणी आणि उसात साखर आहे क्रिया करा ते ते तुम्हाला मिळेल. संताशिवाय जग कुणी सुधारू शकत नाही. चांगल्या माणसात बसा, आई-वडिलांनी आपल्या संततीवर चांगले संस्कार करावे असेही ते म्हणाले. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर व त्यांच्या सहकारी बांधवांनी मोठा बंदोबस्त दिला होता. विविध वाहिन्यांवर त्यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे त्यांनी सुरुवातीपासूनच कॅमेरे बंद ठेवण्याची सूचना केली होती. कीर्तन ऐकण्यासाठी तरुण व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
Reactions

Post a Comment

0 Comments