धक्कादायक,आठ वर्षांच्या मुलीवर नराधम बापाकडूनच अत्याचार
सोलापूर: जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या बापाला अटक केली आहे. बाप आपल्या मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार करत होता. अत्याचाराची गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारुन टाकण्याची धमकी बाप मुलीला देत होता. त्यामुळे ही मुलगी अत्याचार सहन करत होती. मात्र, दिवसेंदिवस बापाचे अत्याचार सहन करण्यापलिकडे गेल्यावर तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने पोलिसांकडे धाव घेत आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली.
0 Comments