डॉ. ज्योती टोंगळे यांचे एम डी परीक्षेत यश
माढा : येथील डॉ. ज्योती संदिप टोंगळे या एम डी होमिओपॅथी च्या शेवटच्या वर्षात फर्स्ट क्लास सोबत डीस्टींक्शन घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचं पदव्युत्तर शिक्षण श्री भगवान होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे संपन्न झालं. त्या माढा तालुक्यातील पहिल्या महिला एम डी होमिओपॅथी डॉक्टर ठरल्या आहेत. आधीपासूनच होमिओपॅथी या शास्त्राविषयी अधिक आवड असल्यामुळे आणि विविध रुग्णांमध्ये आलेल्या चमत्कारिक रिसल्ट मुळे त्यांनी लग्न झाल्या नंतर सुद्धा एम डी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा रुग्णांना व्हावा या अनुषंगाने होमिओपॅथी विषयी बारकाईने अभ्यास केला. पदव्युत्तर शिक्षणासोबत त्यांनी होमिओपॅथी विषयीचे अनेक ऍडव्हान्स कोर्सेस सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. कोलेस्टेरॉल, शुगर, बी पी, शरीरातील गाठी, गर्भाशयाच्या गाठी व तक्रारी, पाळीच्या तक्रारी या आणि अशा इतर बऱ्याच आजारांवर होमिओपॅथी उपचार पद्धती द्वारे अतिशय सहजरित्या रुग्ण बरे होऊ शकतात. होमिओपॅथी औषधांचा चांगला परिणाम रुग्णाच्या शरीरावर कशा प्रकारे होत जातो याचा बारकाईने अभ्यास डॉ. ज्योती यांनी एम डी शिक्षणात केला आहे. या शिक्षणाचा फायदा गरजू रुग्णांना व्हावा म्हणून त्यांनी अल्पदरात तीन दिवसीय शिबीर सुद्धा आयोजित केले होते आणि इथून पुढे सुद्धा गरीब गरजू रुग्णांसाठी अशा शिबिराद्वारे सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. आपण घेतलेलं वैद्यकीय शिक्षण फक्त अर्थार्जनापुरतं मर्यादित नसावं तर त्याचा फायदा सर्व जनसामान्यांना व्हावा अशा प्रगल्भ विचारांचं बीज पहिल्यापासूनच वडील गोविंद कारामुंगे नंतर सासरे डॉ सोमेश्वर टोंगळे यांच्या कडून मनात रोवलं गेलं होतं. त्यांच्या या यशामध्ये पती डॉ संदिप टोंगळे व कन्या स्वरा हिचा मोलाचा वाटा आहे.
0 Comments