Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री मार्कंडेय टॅलेंट सर्च परीक्षा 2020 बक्षिस वितरण

श्री मार्कंडेय टॅलेंट सर्च परीक्षा 2020 बक्षिस वितरण

सोलापूर- महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटना व कुचन प्रशाला संयुक्त विद्यमाने श्री मार्कंडेय जयंती निमित्त श्री मार्कंडेय टॅलेंट सर्च परीक्षा 2020  ही परीक्षा इ.4 थी ते 9 वीपर्यंत मराठी/सेमी इंग्रजी व इंग्रजी असे दोन माध्यमा तून परीक्षा घेण्यांत आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.शि.संस्थेचे सहसचिवा तथा संयोजिका संगीताताई इंदापुरे ह्या होत्या तर देणगी दार सी.ए. असो. सोलापूर शाखेचे चेअरमन चंद्रकांत इंजामुरी, लायन्स  क्लब सोलापुर सेंट्रलचे माजी अध्यक्ष सी.ए.चंद्रकांत रच्चा, देविदास दिड्डी , पद्मशाली इंजि .असो.चे अध्यक्ष जगदिश दिड्डी,पद्मशाली इंजिनिअर्स असो.चे कोषाध्यक्ष चंदुलाल अंबाल, उपाध्यक्ष विरेंद्र बोलाबत्तीन,  प्रसिध्द  उद्योगपती विजय कुमार उडता, सी.ए. अरविंद शंकुर,डाॅ.अशोक यक्कल देवी,  सहसंयोजक यशवंत इंदापुरे,काशिनाथ भातगुणगी, संगीता भातगुणगी,प्राचार्य शरद पोतदार,आदी मान्यवरां च्या शुभहस्ते श्री मार्कंडेय महामुनी आणि श्री सरस्वती प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यांत आले आणि व्दीपप्रजलन करून नारळ वाढविण्यांत आले. प्रास्ताविक भाषणांत कुचन प्रशाला प्राचार्य शरद पोतदार  यांनी परीक्षा घेण्या मागील उद्देश सांगितले आणि सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सर्व मान्यवरांचे शाल, मोमेंटम, बुके देऊन यथोचित सन्मान करण्यांत आले. त्यानंतर उपक्रमशील शाळा पुरस्कार कुचन प्रशाला,  रा.ना. बोमड्याल प्राथ.शाळा व डी.आर.श्रीराम इंग्लिश मेडी.स्कूल च्या मुख्याध्यापकांना  शाल, मोमेंटम  व बुके देऊन गौरविण्यांत आले.स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्याना प्रथम क्रमांक रू.1500/- व्दितीय क्रमांक रू. 1000/- तृतीय क्रमांक रू. 500/-  असे एकूण रू.36000/-  रोख रक्कम बक्षिसे देण्यांत आले. इंग्रजी माध्यमातुन इ.4 थी तून प्रथम क्रमांक पवित्रा कामुनी( एस.व्ही.सी.एस.इ.मेडी. स्कूल ) व्दितीय क्रमांक प्रवलिका बिंगी( अव्दिक क्लासेस ) तृतीय क्रमांक सानिका गड्डम ( डी.आर. श्रीराम इंमेडी.स्कूल ) इ.5वी तून प्रथम क्र.कल्पना बुरा ( एस.व्हि.सी.एस.इ.मे.स्कूल   ) व्दितीय क्र.मुरलीधर  गड्डम ( सिध्देश्वर  इ. मे. स्कूल ) तृतीय क्र. हर्षवर्धन पुठ्ठा ( डी. आर. श्रीराम इ.मे. स्कूल  ),इ.6वी तून प्रथम क्र.आर्यन बेत (  डी.आर. श्रीराम इ.मे.स्कूल) व्दितीय क्र.प्रणव नक्का ( अव्दिक क्लासेस  ) तृतीय क्र. नंद किशोर चिन्नी (  प्रिसिजन इं.मे.स्कूल ) इ.7वी तून शाम इराबत्ती, ( गुरूकूल इ.मे. स्कूल ),व्दितीय क्र. वैष्णवी केंची (  श्रीराम इं.मे.स्कूल ) तृतीय क्र.क्रषिकेश अक्कल ( प्रिसिजन इं.मे.स्कूल ), इ.8 वी  तून प्रथम क्र.प्रणव बोल्ली ( एस.व्ही.सी.एस. स्कूल ) व्दितीय क्र.अभिनव गेंट्याल   तृतीय क्र.प्रवलिका गुज्जा ( श्रीराम इं.स्कूल) 9 वी तून प्रथम क्र.अमृता शेरला (श्रीराम  इं.स्कूल ) व्दितीय क्र. परशुराम बोगा ( अव्दिक क्लासेस ) तृतीय क्र.श्रीहरी बुरा (  गुरूकूल इं.मे.स्कूल ) तसेच मराठी/ सेमी इंग्रजी माध्यमातून इ.4थी तून प्रथम क्र.शिरिषा कोंपल्ली ( बोमड्याल प्रा.शाळा ) व्दितीय क्र. महेश दुस्सा ( बोमड्याल प्रा.शाळा ) तृतीय क्र. अक्षदा यरगुंटला ( बुर्ला प्रा.शाळा ) इ.5वी तून प्रथम क्र.निकिता श्रीराम , व्दितीय क्र. अर्चना गरदास, तृतीय क्र. विद्या शावंतुल ( सिंगम प्रा.शाळा ) इ.6 वी तून प्रथम क्र.मधुसूदन मंचीकटला( बोमड्याल प्रा.शाळा) व्दितीय क्र. श्रीवणी द्यावनपल्ली ( सिंगम प्रा. शाळा ) तृतीय क्र. विवेक रच्चा ( बोमड्याल प्रा. शाळा ) इ.7वी तून प्रथम क्र.शैलजा पल्ली ,व्दितीय क्र.विनायक कोटा ( सिंगम प्रा.शाळा ) तृतीय क्र. श्रृतिका गाजूल ( एस.व्ही.सी.एस.) इ.8 वी तून प्रथम क्र. साईकिरण श्रीराम ( कुचन प्रशाला ) व्दितीय क्र. रामा यंगलदास ( पुल्ली कन्या प्रशाला) तृतीय क्र.शितल सग्गम (बिटला प्रशाला ) इ.9वी तून प्रथम क्र.जयश्री मुशन ( बिटला प्रशाला ) व्दितीय क्र.प्रिती सोमा ( पुल्ली कन्या प्रशाला ) तृतीय क्र. नागराज यरगुंटला ( बंडा प्रशाला ) यांना बक्षिसे मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले.विजय कुमार उडता यांनी गोष्ट रूपाने सध्याच्या युगात स्मार्ट शिक्षण कसे घेता येईल हे पटवून दिले. तर काशिनाथ भातगुणगी यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषण संयोजिका संगीताताई इंदापुरे  यांनी विद्यार्थ्यांना जिद्द,चिकाटी आणि मेहनत करून अभ्यास करावे असे सुचविले.तसेच सर्व देणगीदारांचे आभार मानले. या कार्यक्रमास बक्षिसपात्र विद्यार्थी, पालक,विविध प्रशालेतील मुख्या. ,शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. प.शि.संथेच्या सहसचिवा तथा परीक्षा संयोजिका संगीताताई इंदापुरे , सह संयोजक यशवंत  इंदापुरे, कुचन प्रशाला प्राचार्य शरद पोतदार, उपमुख्या. तुकाराम श्रीराम, श्रीनिवास इंदापुरे,कार्य. सदस्य राजेश मामड्याल जाहदा जमादार,मल्लीकार्जून जोकारे, दत्तात्रय मेरगु,अनिल गंजी,राहुल ताटे, सविता गज्जम, प्रतिभा इराबत्ती,पल्लवी ननवरे, विमल दुभाषी,राजश्री वन्नम आदी शिक्षक आणि सेवक परीश्रम घेतले.बक्षिस यादी वाचन निर्मला शिंदे, सुत्र शिंदे संचलन राजश्री कदम यांनी केले तर आभार यशवंत इंदापुरे यांनी मांडले.
Reactions

Post a Comment

0 Comments