Hot Posts

6/recent/ticker-posts

हम जवाब नहीं देंगे ,हम कागज नहीं दिखाएंगे ! - चा सामूहिक नारा

हम जवाब नहीं देंगे ,हम कागज नहीं दिखाएंगे ! - चा सामूहिक नारा


सोलापूर दिनांक -   धर्म आणि जातीच्या नावावर मोदी शहा यांनी ज्या प्रकारे गुजरात मध्ये निष्पाप लोकांच्या रक्ताचा सडा टाकला त्याचाच कित्ता दिल्लीत नागरिकत्वाच्या नावावर  गिरवला जात आहे. अशी जळजळीत टीका कॉ आडम मास्तर यांनी केले. सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन ( सिटू ) जिल्हा समितीच्या वतीने सी ए ए, एन आर सी, एन पी आर, च्या विराधात सोमवार दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 12 वाजता मा जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे माकप चे ज्येष्ठ कामगार नेते माजी आ. कॉ नरसय्या आडम (मास्तर ) यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करण्यात आले. ते बोलताना पुढे म्हणाले की,  देशाची राजधानी कोणामुळे पेटली ? लाठ्या काठ्या, दगड धोंडे,ज्वलनशील पदार्थ कोठून आले? शांतता आणि सुरळीत जनजीवन कोणामुळे विस्कळीत झाले? गृह खाते याला खतपाणी घालणाऱ्या उपद्रवी लोकांकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करत असल्याची शंका व्यक्त आडम यांनी केले. देशात अराजकता आणि असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या नागरिकत्वाचा काळा कायदा लागू होऊ देणार यासाठी सामूहिक रित्या हम जवाब नहीं देंगे ,हम कागज नहीं दिखाएंगे ! चा नारा दिले.त्यांनर नागरिकत्वाच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.यावेळी पोलीसांनी रोखण्याचा प्रयत्न केले मात्र त्यांना चकवा देत होळी करण्यात आली.यावेळी सी ए ए, एन आर सी, एन पी आर कायद्याच्या विरोधात तब्बल एक तास सरकारच्या विरोधात गगनभेदी आवाजात  जोरदार घोषणा देऊन संबंध परिसर दणाणून सोडले. यावेळी सिटू चे महासचिव अँड एम एच शेख यांनी प्रास्ताविक मांडताना म्हणाले की, मोदी सरकार कामगारांना  संपवण्याचा घाट घातला असून कामगार ही व्याख्या फस्त करू पाहत आहे.कामगार संहिता ही  कामगार विरोधी संहिता आहे याची तीव्र शब्दात सरकार च्या धोरणावर टीका केले. यावेळी  नगरसेविका कामीनीताई आडम,माजी नगरसेविका नसीमा शेख,सुनंदा बल्ला, नलिनीताई कलबुर्गी, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, सिद्धपा कलशेट्टी, कुरमय्या म्हेत्रे,युसूफ मेजर, रंगप्पा मरेड्डी,महमद फनिफ सातखेड,फातिमा बेग,सलीम मुल्ला,दीपक निकंबे,मुरलीधर सुंचू,विल्यम ससाणे,वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी,अनिल वासम,अशोक बल्ला,बापू साबळे,अकील शेख, इलियास सिद्दीकी,बाबु कोकणे,बाळासाहेब मल्ल्याळ,विजय हरसुरे,जावेद सगरी, शकुंतला पानिभाते, मल्लेशम कारमपुरी, लिंगवा  सोलापुरे, महादेव घोडके, विरेंद्र पद्मा, दाऊद शेख, सलीम पटेल, सनी शेट्टी,नरेश दुगाने रफिक काझी आदीं सह मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments