Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवा :- प्रा.जितेश कोळी

विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवा :- प्रा.जितेश कोळी

अकलूज / प्रतिनिधि विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवा, मुलांवर आईने संस्कार करावेत,सकारात्मक विचार करावा,मुलांची वैयक्तिक आवड पालकांनी जाणून घेण्याची गरज असल्याचे हास्यतुषार प्रा.जितेश कोळी यांनी श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर शाळेच्या बालक –पालक प्रबोधन मेळाव्यात बोलताना संगितले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.जितेश कोळी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितिन खराडे पाटील उपस्थित होते.तसेच संचालक विनोदकुमार दोशी,डॉ.अपूर्व गिरमे, प्रशाला समिति सभापती निशा गिरमे, सदस्य महादेव अंधारे,यशवंत साळुंखे ,पत्रकार कृष्णा लावंड आदि उपस्थित होते निवार दिनांक २९ रोजी कृष्णा मंगल कार्यालय नऊचारी येथे शिक्षण प्रसारक मंडळ अकलुजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील ,सचिव अभिजीत रणवरे ,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, प्रमुख वक्ते प्रा जितेश कोळी यांनी मांनोरंजनातून प्रभावी शैलीत विद्यार्थी पालकांचे  प्रबोधन करून सर्वांची मने जिंकली,तसेच सदस्य महादेव अंधारे यांनी पालकांचे आपल्या भाषणातून आभार मानले,तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. नितिन खराडे पाटील यांनी असेच पालक¬-विद्यार्थी मेळावे घेणे काळाची गरज असून यातून विद्यार्थ्यांच विकास होतो असे बोलताना संगितले.प्रास्ताविक मुख्याध्यापक पोपटराव भोसले पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे आभार गणेश करडे तर सूत्रसंचालन विलास काटे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक पोपटराव भोसले पाटील प्राथमिकचे गणेश करडे, दत्तात्रय गव्हाने, विलास काटे, श्रीकांत राजमाने, विलास कस्तुरे,रमाकांत साठे, रशीद मुलाणी, रविंद्र कवटे,गणेश म्हसवडे तर महिला शिक्षिका प्रमीला काळे,जानकी वनवे,कांचन कोरेकर,सुवर्णा पवार,शुभांगी कदम,अनिता सूर्यवंशी,माळवदकर,बाबर सेवक बंडू राऊत ,सुनील काळे,भुमकर यांनी कष्ट घेतले यावेळी सर्व पालक,तसेच माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Reactions

Post a Comment

0 Comments