Hot Posts

6/recent/ticker-posts

निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण बाबत गटविकास अधिकारी यांचे मौन

निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण बाबत गटविकास अधिकारी यांचे मौन

            सांगोला (कटुसत्य वृत्त):- निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ३८७/१ व ३८७/२ ह्या गटावर ग्रामपंचायतीचा कब्जा असताना गावातील काही राजकीय लोकांनी व कार्यकर्ते यांनी सदर मिळकतीवर अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व सरपंच तसेच गटविकास अधिकारी यांना वारंवार निवेदन दिले असून सुद्धा ते त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण करणाऱ्याची संख्या वाढत चाललेली  आहे.  तालुका गटविकास अधिकारी सदर घटनेला खतपाणी घालत असल्याची गावातील सर्वसामान्यांची धारणा झाली आहे. सदर अतिक्रमण हे कोणीही काढू शकत नाही असा सर्वसामान्य लोकांचा समज झाला आहे.  त्यामुळे शासकीय मालमत्ता धोक्यात आली आहे . सदर अतिक्रमण ६० दिवसात न हटविल्यास काही ग्रामस्थ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. सदर घटनेमुळे काही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी जबाबदार असतील,असे नागरिकांनी सांगितले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments