पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 'व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे' जनतेशी साधला संवाद
भारतीय जनता पार्टी सांगोला यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट प्रक्षेपण सादर केले
सांगोला (कटुसत्य वृत्त): "गरीब कल्याण सम्म्लेन" च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे "अमृत मिशन" "किसान सम्मान निधि" च्या लाभार्थि यांच्या सोबत काल मंगळवार दि. 31 मे रोजी सकाळी 10 वा. 30 मी. संवाद साधला. यावेळी पंतप्रधान "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी" योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी वितरित केला. रब्बी हंगामात सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी आर्थिक मदत देण्यासाठी व शेतकरी खचला नाही पाहिजे ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जवळपास 21 हजार करोड रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांनी सांगितली.
सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्क्रीन लावून कार्यकर्ते, नागरिकांसह मोठ्या संख्येच्या सहभागाने चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सोशल मीडिया मध्ये या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात आली. हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे सांगोला तालुका अध्यक्ष चेतनसिंह ऊर्फ बाळासाहेब केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयांमध्ये स्क्रीन लावून कार्यकर्ते, नागरिकांसह मोठ्या संख्येच्या सहभागाने चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत भारत सरकारच्या योजना पोहचविल्या जात आहेत. ज्या- ज्या वेळी सर्वसामान्य नागरिकांना अडचणी आल्या, त्या वेळी भारतीय जनता पार्टीने त्यांना मदतीची भूमिका बजावली आहे. सर्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी अडचणीच्या काळामध्ये गोरगरिबांना मोफत धान्य दिले. आज शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊ केली आहे. यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून यंदाच्या रब्बी हंगामात शेतकरी जोमाने कामाला लागतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह ऊर्फ बाळासाहेब केदार सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा सचिव संतोष मोगले, वसंत सुपेकर,संग्राम गायकवाड, शंकर खरात,प्रसाद फुले,मानस कामलापूरकर, संजय केदार,प्रकाश बाबर,देविदास कांबळे,भालचंद्र भंडारे ,विनायक शिंदे,उत्तम गायकवाड, राहुल केदार,ओंकार कुलकर्णी, दीपक केदार,विलास बेहेरे, सत्यवान खांडेकर,अजित केदार, अप्पसो शिंदे,अजय केदार,शरद शिंदे,विनायक बुरकुल,संतोष आमले,दीपक केदार,बाळासो चव्हाण,आकाश सावंत,विनोद उबाळे इत्यादि व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments