Hot Posts

6/recent/ticker-posts

महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

 महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांना टिळकांच्या कार्याची ओळख करून देत राष्ट्रभक्ती, समाजप्रबोधन आणि स्वराज्याच्या मूल्यांची प्रेरणा देण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. 


त्यानंतर विद्यार्थ्यांनी टिळकांच्या आयुष्यातील महत्त्वाची कार्ये, त्यांचे निर्णय व ऐतिहासिक भूमिका यावर भाषण सादर केले. विद्यार्थी मनोगत मध्ये गौरी नवले, आर्या लोकरे, यशवर्धन खटके, संस्कार देवकर यांनी टिळकांविषयी विचार व्यक्त केले. विशेषतः "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" या घोषणेमागची त्यांची दूरदृष्टी विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडली. तसेच शिक्षक मनोगतामध्ये कांबळे मॅडम यांनी टिळकांचे विचार आजच्या पिढीला किती महत्त्वाचे आहेत यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. गगन गोडसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोडसे सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन नागनाथ सुक्रे सर यांनी केले.

कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक शोएब बागवान सर, उपमुख्याध्यापक शरद सातव सर, सोहम व्यवहारे सर, अश्विनी कांबळे मॅडम,मनीषा शिंदे मॅडम, वंदना क्षीरसागर मॅडम,सायली गिरमे मॅडम,पल्लवी आरकिले मॅडम, मंगल नाईकनवरे मॅडम, पालक आणि अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
Reactions

Post a Comment

0 Comments