Hot Posts

6/recent/ticker-posts

अक्कलकोट भाजपच्या शिबिरात ५७४ जणांचे रक्तदान

 अक्कलकोट भाजपच्या शिबिरात ५७४ जणांचे रक्तदान



हंजगी : (कटूसत्य वृत्त):-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथे भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ५७४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर शिबिराचा प्रारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. श्री स्वामी समर्थ
महाराज प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोरक्षक दिनानिमित्त वीस गोरक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मिलन कल्याणशेट्टी, जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण, सागर कल्याणशेट्टी, मनोज कल्याणशेट्टी, सुदर्शन यादव, विकास वाघमारे, मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील, सुनील खेड, अमोल हिप्परगी, प्रभाकर मजगे, शिवशरण जोजन, शिवशरण वाले, मल्लिनाथ स्वामी, प्रवीण शहा, संजय भागानगरे, सुनील गवंडी, मोतीराम राठोड, महेश हिंडोळे, आनंद तानवडे, परमेश्वर यादवाड, गिरमल गंगोंडा, सभापती अप्पू परमशेट्टी आण्णप्पा बाराचारी, सुरेश नागुर, आप्पासाहेब बिराजदार, शंकर भांजी, महेश पाटील, राजेंद्र बंदीछोडे, सुरेश गड्डी, रामचंद्र अरवत, सुनील सिद्धे, बसवराज हौदे, स्वामीनाथ हिप्परगी, शिवलिंग स्वामी, जयशेखर पाटील राजशेखर हिप्परगी, शिवराज स्वामी, नागराज कुंभार, शबाब कोरबू, कांतू धनशेट्टी, अविनाश मडीखांबे यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे सोसायटी चेअरमन, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक उपस्थित
होते.
Reactions

Post a Comment

0 Comments