म. गांधी प्राणीसंग्रहालयाचा विकासाचा करार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 24, 2025

म. गांधी प्राणीसंग्रहालयाचा विकासाचा करार

 म. गांधी प्राणीसंग्रहालयाचा विकासाचा करार





महापालिका आणि एनटीपीसीमध्ये दोन कोटी ७९ लाखांचा करार

सोलापूर :  (कटूसत्य वृत्त):-  

सोलापूर महानगर पालिकेस महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाच्या विकासासाठी सिएसआर फंडातून

दिलेल्या दोन कोटी ७९ लाखांच्या विकास कामांचा करार मंगळवार दि. २२ जुलै रोजी करण्यात आला. या निधीतून प्राणीसंग्रहालयामधील काळवीटांचे अधिवास व निवासस्थान, बिबट्या व सिंह यांचे क्राल परिसर तसेच मोरांचे अधिवास

उभारण्यात येणार आहेत.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, एनटीपीसीचे सोलापूरचे कार्यकारी संचालक बी. जे. सी. शास्त्री, कक्ष विभागप्रमुख मनोरंजन सारंगी, पर्यावरण विभागप्रमुख रफीक उल इस्लाम, अमित सिंग, प्राणी संग्रहालय प्रकल्प विभागाचे उपअभियंता अविनाश वाघमारे, कनिष्ठ अभियंता चेतन

प्रचंडे यांच्यासह अन्य अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या निधीद्वारे प्राणीसंग्रहालयाच्या परिसरातील

नैसर्गिक अधिवासाची रचना अधिक सुसज्ज केली जाणार आहे. बिबट्या व सिंहांसाठी आधुनिक व सुरक्षित काल उभारणे, काळवीट व मोरांसाठी नैसर्गिक अधिवास तयार केले जाणार प्राणीसंग्रहालय हे सोलापूर शहराच्या पर्यावरणीय जडणघडणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. 


चौकट 

एनटीपीसी समाजाशी नाते दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. प्राणीसंग्रहालयाचा विकास म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण व भावी पिढ्यांसाठी शाश्वत जीवनमूल्यांची जपणूक आहे. या निधीमुळे शहरातील

पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळेल. शालेय विद्यार्थी पर्यटक व नागरिकांसाठीही हे एक शैक्षणिक व मनोरंजनात्मक स्थळ

निर्माण होईल.

- बी. जे. सी. शास्त्री, कार्यकारी

संचालक, एनटीपीसी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages