Hot Posts

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी टेंभुर्णीत निषेध मोर्चा

अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी टेंभुर्णीत निषेध मोर्चा


टेंभुर्णी : [प्रतिनिधी ]- सोलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ टेंभुर्णीत 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या' वतीने निषेध मूक मोर्चा काढून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सोलापूर येथे समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला होता.या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी 'मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.या मोर्चात काळ्या फिती लावून महिला,पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.करमाळा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार  अर्पण करून निषेध मूक मोर्चास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नेण्यात आला.तेथे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी निवेदन स्विकारले.यावेळी एपीआय राजेंद्र मगदूम,एपीआय शिवाजी शितोळे हे उपस्थित होते. यावेळी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील धोत्रे,युवक संघटनेचे प.महाराष्ट्र अध्यक्ष अमोल धोत्रे,संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सरस्वती पवार,तालुकाध्यक्ष संजय गुंजाळ,विकास धोत्रे,प्रतीक माने,नामदेव धोत्रे,दिलीप पवार,शंकर जाधव,संतोष धोत्रे,तात्या शिंदे,विकास सुर्वे यांच्यासह महिला,पुरुष उपस्थित होते. या मोर्चात सरपंच प्रमोद कुटे,गणेश केचे,प्रशांत देशमुख शैलेश ओहोळ यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. 


Reactions

Post a Comment

0 Comments